इंटरनेटचा वेग आणखी वाढेल, DoT जूनमध्ये करू शकते 5G स्पेक्ट्रमचा लिलाव
India 5G Services: मागील दोन वर्षांपासून चर्चेत असलेली 5G सेवा देशात लवकरच सुरु होऊ शकते. 5G सेवा सुरु झाल्यानंतर इंटरनेटचा वेग आणखी वाढणार आहे.

India 5G Services: मागील दोन वर्षांपासून चर्चेत असलेली 5G सेवा देशात लवकरच सुरु होऊ शकते. 5G सेवा सुरु झाल्यानंतर इंटरनेटचा वेग आणखी वाढणार आहे. सरकार जून महिन्यात 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची तयारी करत आहे. 5G नेटवर्कमधील इंटरनेट स्पीड 4G नेटवर्कपेक्षा खूप वेगवान असेल.
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले की, ''सरकार जूनच्या सुरुवातीला 5G स्पेक्ट्रमचा लिलाव करू शकते. दूरसंचार विभाग (DoT) अपेक्षित वेळेनुसार काम करत आहे. यासोबतच स्पेक्ट्रमच्या किमतीबाबत दूरसंचार कंपन्यांची चिंता दूर करण्याचाही प्रयत्न सुरू आहे.''
अश्विनी वैष्णव म्हणाले, “आम्ही लिलाव करण्याच्या आमच्या अंतिम मुदतीनुसार पुढे जात आहोत. जूनच्या सुरुवातीला हा लिलाव सुरू होण्याची शक्यता आहे.'' त्यांच्या मते, डिजिटल कम्युनिकेशन कमिशन ट्रायच्या शिफारशींवर विचार करेल आणि स्पष्टीकरणासाठी त्यांच्याशी संपर्क साधेल.
स्पेक्ट्रमच्या किमतीत 39 टक्क्यांनी कपात
दूरसंचार नियामक TRAI ने देशात 5G सेवा सुरू करण्यासाठी स्पेक्ट्रमचा मोठा लिलाव करण्याची योजना तयार केली आहे. अलीकडेच, TRAI ने 5G सेवांसाठी 30 वर्षांहून अधिक काळ विविध बँडमध्ये 7.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या स्पेक्ट्रमचा लिलाव करण्याची शिफारस केली होती. ट्रायच्या या शिफारशीमध्ये स्पेक्ट्रमच्या किमतीत पूर्वीच्या तुलनेत 39 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. अशातच स्पेक्ट्रमच्या किमतीत कपात करूनही टेलिकॉम कंपन्या निराश आहेत. टेलिकॉम कंपन्यांची संघटना असलेल्या सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) ने ट्रायने प्रस्तावित केलेली किंमत खूप जास्त असल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
