(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Instagram New Feature: इन्स्टाग्रामने लॉन्च केलं नवीन फीचर, लाईक्स हाईड करता येणार
यूजरला वाटत असेल की आपल्या पोस्टवर आलेल्या लाईक्स इतरांना दिसू नये, तर या लाईक्स Hide Like Count द्वारे लपवू शकतो. आपले लाईक्स हाईड करायचे की नाही हे आपल्या इच्छेवर अवलंबून असेल.
Tech News : सोशल मीडिया (Social Media) साईट इन्स्टाग्रामने (Instagram) आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर आणण्याची घोषणा केली आहे. या फीचरद्वारे इन्स्टाग्राम यूजर त्यांच्या पोस्टवर आलेल्या लाईक्स हाईड करु शकणार आहेत. इन्स्टाग्रामकडून गेल्या काही काळापासून या फीचरची चाचणी सुरु होती. कंपनीने बुधवारी याची अधिकृत लाँचिंग केली आहे. या फीचरद्वारे यूजर्सना त्यांचे अनुभव नियंत्रित करण्याची सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे फेसबुकसाठीही हे फीचर लॉन्च करण्यात आले आहे. याशिवाय फेसबुक (Facebook) यूजर्सना नवीन टूलही मिळणार आहे. याद्वारे ते आपल्या फीडला कन्ट्रोल करु शकतात.
Hide Like Count फीचर काय आहे?
इंस्टाग्रामच्या या नवीन फीचरद्वारे यूजर आपल्या पोस्टवर आलेल्या लाईक्स कन्ट्रोल करु शकणार आहे. यूजरला वाटत असेल की आपल्या पोस्टवर आलेल्या लाईक्स इतरांना दिसू नये, तर या लाईक्स Hide Like Count द्वारे लपवू शकतो. आपले लाईक्स हाईड करायचे की नाही हे आपल्या इच्छेवर अवलंबून असेल.
Hide Like Count फीचर कसे वापरावे?
Hide Like Count फीचर वापरण्यासाठी प्रथम आपल्या इंस्टाग्रामच्या सेटिंग्जवर जा. तिथे New Post Section मध्ये जा. येथे जाऊन 'Hide Like Count' या पर्यायावर क्लिक करा. यावर क्लिक करताच हे नवं फीचर आपल्या सर्व पोस्टवर लागू केले जाईल.
फेसबुकसाठी नवीन टूल
इन्स्टाग्रामने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुक यूजर्ससाठी एक नवीन टूलही बाजारात आणण्यात आले आहे. याद्वारे ते आक्षेपार्ह कंन्टेन्ट फिल्टर करु शकणार आहेत. तसेच आपण न्यूजफीडमध्ये दिसणाऱ्या कंटेन्ट कन्ट्रोल करु शकणार आहेत. शिवाय आपल्या पोस्टवर कोण कमेंट करु शकतो यूजर हे देखील ठरवू शकणार आहे.