एक्स्प्लोर
Advertisement
ideaची नवी ऑफर, तब्बल 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
रिलायन्स जिओनं आपली 'धन धना धन' ऑफर नव्यानं आणल्यानंतर आता ideaने देखील कंबर कसली आहे. जिओच्या या प्लानला टक्कर देण्यासाठी आयडियानं नवा प्रीपेड प्लान आणला आहे. यामध्ये यूजर्संना 453 रुपयात 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.
मुंबई: रिलायन्स जिओनं आपली 'धन धना धन' ऑफर नव्यानं आणल्यानंतर आता ideaने देखील कंबर कसली आहे. जिओच्या या प्लानला टक्कर देण्यासाठी आयडियानं नवा प्रीपेड प्लान आणला आहे. यामध्ये यूजर्संना 453 रुपयात 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. जिओनं नुकताच 399 रुपयांच्या नवा प्लान आणल्यानंतर आता आयडियानं देखील हा प्लान आणला आहे.
आयडियाच्या या प्लानमध्ये दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. ज्याची वैधता 84 दिवसांसाठी असणार आहे. म्हणजेच जवळजवळ तीन महिने.
काय आहे जिओची नवी धन धना धन ऑफर?
धन धना धन ऑफर सुरु ठेवण्यासाठी जिओ यूजर्संना यापुढे 399 रुपयांचं रिचार्ज करावं लागणार आहे. 399 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला तीन महिन्यांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग आणि 1 जीबी डेटा दररोज म्हणजेच 84 जीबी डेटा मिळणार आहे. कारण की, या प्लानची वैधता 84 दिवसांची आहे.
याशिवय कंपनीनं आपल्या प्रीप्रेड यूजर्ससाठी 19 रुपयांपासून 9999 रुपयांपर्यंतचे प्लान आणले आहेत. 309 रुपयांच्या प्लानमध्ये 56 दिवसांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 56 जीबी डेटा मिळणार आहे. 506 रुपयांच्या प्लानमध्ये 112 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सेवा मिळणार आहे. ही ऑफर 56 दिवसांसाठी असणार आहे.
जर तुम्ही पोस्टपेड यूजर्स असाल तर 399 रुपयांच्या धन धना धन ऑफरचा अधिक फायदा मिळणार आहे. कारण की, पोस्टपेड यूजर्ससाठी 90 दिवस ही ऑफर असणार आहे. तर प्रीपेड यूजर्ससाठी ही ऑफर 84 दिवसांसाठी असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement