एक्स्प्लोर

Recall send email in Gmail : चुकीच्या आयडीवर मेल पाठवलाय? घाबरण्याची गरज नाही, पाठवलेला मेल परत घेऊ शकता...

काही वेळेला नजरचुकीनं तुमच्याकडून चुकीच्या आयडीवर मेल पाठवला जातो. त्यामुळं तुमची चिंता वाढते. पण आता तुम्ही चुकीच्या मेल आयडीवर मेल पाठवला तरी तो मेल तुम्हा परत घेता येतो.

Recall send email in Gmail : अनेकदा तुम्ही तुमच्या मित्र- मैत्रिणींना किंवा ऑफिशियल कामासाठी मेल (Mail) पाठवता. पण काही वेळेला नजरचुकीनं तुमच्याकडून चुकीच्या आयडीवर मेल पाठवला जातो. त्यामुळं तुमची चिंता वाढते. पण आता तुम्ही चुकीच्या मेल आयडीवर मेल पाठवला तरी तो मेल तुम्हा परत घेता येतो. मेल पाठवल्यानंतर 30 सेंकदाच्या आत तुम्हाला मेल परत घ्यायची प्रक्रिया करायची आहे.
 
अनेकदा असे घडते की तुम्ही तुमच्या Gmail वरुन चुकीच्या आयडीवर मेल पाठवता. अनेकवेळा लोक वैयक्तिक माहिती, फोटो आणि व्हिडिओ दुसऱ्या कोणाला तरी ईमेल करतात. अशी चुक होण्याची प्रामुख्यानं दोन कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही मेल सर्च करता, त्यावेळी तुम्ही ड्रॉप डाउनमध्ये सारखीच नावे असलेला चुकीचा ईमेल आयडी निवडता.  किंवा दुसरे तुमच्याकडून मेल टाईप करताना चूक होते. यामुळे तो मेल दुसऱ्याच मेल आयडीवर जातो. 

घाबरण्याची गरज नाही, 30 सेकंदाच्या आत पाठवेलला मेल परत घेऊ शकता 

तुमच्याकडून जर चुकून दुसऱ्या मेल आयडीवर मेल गेला असेल तर घाबरण्याची गरज नाही. Gmail तुम्हाला पाठवलेला मेल परत घेण्याची परवानगी देतो. मात्र, हा पर्याय सक्रिय करणं आवश्यक आहे. एकदा पर्याय सक्रिय झाल्यानंतर, आपण 30 सेकंदांच्या आत पाठवलेला मेल रिकॉल करु शकता.  जेव्हा Gmail वरुन एखाद्याला मेल पाठवला जातो, तेव्हा तुमच्या स्क्रीनच्या तळाशी डाव्या बाजूला Undo आणि View मेसेजचा पर्याय येतो. तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर Undo वर क्लिक करा. पाठवलेला मेल परत येईल. आवश्यक बदल केल्यानंतर तुम्ही तो मेल रद्द करु शकता किंवा त्याच ईमेल पत्त्यावर पुन्हा पाठवू शकता.

Undo चा पर्याय बहुतेक ईमेलमध्ये सक्रिय राहतो. जर तुमच्या ईमेलमध्ये Undo हा पर्याय सक्रिय नसेल तर तो सहजपणे सक्रिय केला जाऊ शकतो.

जाणून घेऊयात  Undo चा पर्याय कसा सक्रिय करायचा.... 

1) प्रथम Gmail वर लॉग इन करा
2) Gmail च्या Settings पर्यायावर क्लिक करा
3 ) सर्व सेटिंग्ज पाहा वर क्लिक करा
4) General Settings मध्ये Undo Send चा पर्याय दिसेल
5) इथे तुम्हाला रद्दीकरण कालावधीत 5,10,20,30 सेकंदांचा पर्याय निवडावा लागेल. तसेच  'सेव्ह चेंजेस'चा पर्याय देखील असेल. त्यावर क्लिक केल्यावर Undo चा पर्याय सक्रिय होईल.

महत्त्वाच्या बातम्या:

Gmail Trick : तुम्ही पाठवलेला मेल रिसिव्हरने वाचला की, नाही हे जाणून घ्यायचंय? 'या' ट्रिकचा वापर करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MS धोनी OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर वाद पेटला; कोच थेट मैदानात अंपायरशी भिडला, जाणून घ्या नेमकं काय घडलं...
MS धोनी OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर वाद पेटला; कोच थेट मैदानात अंपायरशी भिडला, जाणून घ्या नेमकं काय घडलं...
उमरेडच्या ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट; 7 ते 8 कामगार जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
उमरेडच्या ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट; 7 ते 8 कामगार जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
CSK vs KKR IPL 2025 : कर्णधार म्हणून परतला 'थाला', पहिल्याच सामन्यात धोनीने घेतला मोठा निर्णय! म्हणाला,  आम्हीही आधी...
कर्णधार म्हणून परतला 'थाला', पहिल्याच सामन्यात धोनीने घेतला मोठा निर्णय! म्हणाला, आम्हीही आधी...
RTO ने लाच घेण्यासाठी दोघे कामाला ठेवले; 500 रु. घेताना ACB च्या जाळ्यात अडकले
RTO ने लाच घेण्यासाठी दोघे कामाला ठेवले; 500 रु. घेताना ACB च्या जाळ्यात अडकले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jay Pawar Engagement | जय पवारांचा साखरपुडा, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एका फोटोमध्येUdayanraje Bhosale:थोरले प्रतापसिंह महाराजांनी स्त्री शिक्षणाची शाळा सुरू केली, उदयनराजेंचा नवा दावाABP Majha Headlines 9 PM Top Headlines 9 PM 11 April 2025 रात्री 9 च्या हेडलाईन्सAshwini Bidre Case | अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपींना 21 एप्रिलला शिक्षा सुनावणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MS धोनी OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर वाद पेटला; कोच थेट मैदानात अंपायरशी भिडला, जाणून घ्या नेमकं काय घडलं...
MS धोनी OUT की NOT OUT? थर्ड अंपायरच्या निर्णयानंतर वाद पेटला; कोच थेट मैदानात अंपायरशी भिडला, जाणून घ्या नेमकं काय घडलं...
उमरेडच्या ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट; 7 ते 8 कामगार जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
उमरेडच्या ॲल्युमिनियम कंपनीत भीषण स्फोट; 7 ते 8 कामगार जखमी, स्थानिकांनी घेतली धाव
CSK vs KKR IPL 2025 : कर्णधार म्हणून परतला 'थाला', पहिल्याच सामन्यात धोनीने घेतला मोठा निर्णय! म्हणाला,  आम्हीही आधी...
कर्णधार म्हणून परतला 'थाला', पहिल्याच सामन्यात धोनीने घेतला मोठा निर्णय! म्हणाला, आम्हीही आधी...
RTO ने लाच घेण्यासाठी दोघे कामाला ठेवले; 500 रु. घेताना ACB च्या जाळ्यात अडकले
RTO ने लाच घेण्यासाठी दोघे कामाला ठेवले; 500 रु. घेताना ACB च्या जाळ्यात अडकले
युवकाने मित्राच्या मदतीने स्वत:चंच केलं अपहरण, आई-वडिलांकडे मागितले 3 लाख; पोलिसांपुढे बनाव उघड
युवकाने मित्राच्या मदतीने स्वत:चंच केलं अपहरण, आई-वडिलांकडे मागितले 3 लाख; पोलिसांपुढे बनाव उघड
पुण्यात वासनांध नराधमाचा कुत्रीवर अत्याचार; 'ते' पाहून मालकाला आला संशय, परिसरात संतापाची लाट
पुण्यात वासनांध नराधमाचा कुत्रीवर अत्याचार; 'ते' पाहून मालकाला आला संशय, परिसरात संतापाची लाट
बुलढाण्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू उष्माघाताने नाही, वैद्यकीय अहवालातून समोर आलं वेगळच कारण
बुलढाण्यातील विद्यार्थ्याचा मृत्यू उष्माघाताने नाही, वैद्यकीय अहवालातून समोर आलं वेगळच कारण
5 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात; परमेश्वर जाधवांना रंगेहाथ अटक
5 हजार रुपयांची लाच घेताना ग्रामसेवक जाळ्यात; परमेश्वर जाधवांना रंगेहाथ अटक
Embed widget