एक्स्प्लोर
नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला व्हॉट्सअॅपवरुन किती मेसेज शेअर झाले?
मुंबई : 2016 या वर्षाला निरोप देत मोठ्या उत्साहाने जगभर 2017 या वर्षाचं स्वागत करण्यात आले. सोशल मीडिया आणि स्मार्टफोनवरील मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून लाखो-कोट्यवधी मेसेजची देवण-घेवाण झाली. आता व्हॉट्सअॅप पुरतं बोलायचं झाल्यास 31 डिसेंबरच्या संध्याकाळी म्हणजेच नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला तब्बल 63 अब्ज मेसेज सेंड आणि रिसिव्ह झाले.
'व्हेंचरबिट'च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 31 डिसेंबरच्या संध्याकाळी जगभरात 63 अब्ज मेसेज, 7 अब्ज 90 कोटी फोटो आणि 2 अब्ज 40 कोटी व्हिडीओ सेंड-रिसिव्ह झाले. इतक्या मोठ्या प्रमाणात मेसेज, फोटो, व्हिडीओची देवणा-घेवाण एकाच दिवशी होणं, हा व्हॉट्सअॅपच्या इतिहासातील पहिलाच दिवस होता.
व्हॉट्सअॅपच्या अधिकृत माहितीनुसार, नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 31 डिसेंबरला भारतात तब्बल 14 अब्ज मेसेजची देवाण-घेवाण झाली. 16 कोटी अॅक्टिव्ह व्हॉट्सअप यूझर्स भारतात आहेत. याआधी 2016 च्याच दिवाळीत एकाच रात्री 8 अब्ज मेसेजची नोंद आहे. मात्र, नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतासह जगभरातील मेसेजनी विक्रम नोंदवला आहे.
व्हॉट्सअॅपने दिलेल्या माहितीनुसार, नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला भारतातून 3 अब्ज 10 कोटी फोटो, 70 कोटी जीआयएफ फोटो आणि 60 कोटी 10 लाख व्हिडीओ शेअर झाले. त्यामुळे भारतातील मेसेजिंग अॅपच्या यादीत व्हॉट्सअॅप पहिल्या स्थानावर आहे, हे स्पष्ट झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement