एक्स्प्लोर
होंडाच्या अनेक कारवर खास ऑफर
होंडानं 'दी ग्रेट होंडा फेस्ट' ही स्पेशल ऑफर आणली आहे. ही ऑफर 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत असणार आहे.
मुंबई : होंडानं आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 'दी ग्रेट होंडा फेस्ट' ही स्पेशल ऑफर आणली आहे. ही ऑफर एक सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2017 पर्यंत असणार आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट आणि 1 रुपयात होंडा एश्योर सब्सक्रिप्शन मिळणार आहे. याशिवाय दोन भाग्यवान विजेत्यांना अमेरिका फिरण्याचीही संधी आहे.
कंपनीच्या मते, जे ग्राहक एक सप्टेंबर ते 31 ऑक्टोबरमध्ये नवी होंडा कार खरेदी करतील ते अमेरिका ट्रिपसाठी दावेदार ठरतील. त्यासाठी कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन ‘एडवेंचर ऑफ स्पेस, अर्थ एंड ओसियन’ येथे तुमची माहिती भरावी लागेल.
विजेत्यांना कंपनीच्या वतीनं कॅनडी स्पेस सेंटर, ग्रँण्ड कॅनियन, लास वेगास आणि लॉस एंजल्स फिरण्याची संधी मिळणार आहे.
होंडाच्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट?
होंडा ब्रियो : ब्रियो कारवर 21,200 रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये 1 रुपयात होंडाची एश्योर मेंबरशीप देखील मिळणार आहे.
होंडा अमेझ : होंडा अमेझच्या एस, एस (ओ), एसव्ही आणि व्हीएक्स व्हेरिएंट (पेट्रोल आणि डीझेल) वर 50,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे.
होंडा जॅज : होंडा जॅज या कारवर 42,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. यामध्ये 1 रुपयांत होंडा एश्योर मेंबरशीप मिळणार आहे. पेट्रोल आणि डीझेल व्हेरिएंटवर ही ऑफर असणार आहे.
होंडा बीआर-व्ही : व्हीएक्सं ग्रेड (पेट्रोल आणि डीझेल) व्हेरिएंटवरप एक लाखापर्यंतची सूट मिळू शकते.
(नोट : संबंधित ऑफरबाबत अधिक माहितीसाठी आपल्या जवळील डिलरशी संपर्क साधा)
बातमी सौजन्य : cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement