(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Google New Feature: आता तुमचे फोटो आणि व्हिडीओ लपवता येणार; गुगलचं नवीन फीचर
तु्म्हाला जर तुमचे खास फोटो आणि व्हिडीओ कोणाला दाखवायचे नसतील तर तुमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे. गूगल हे गूगल फोटोमध्ये एक खास फीचर घेऊन येत आहे.
Google लवकरच अँड्रॅाइड यूजर्ससाठी एक खास फीचर घेऊन येत आहे. या खास फीचरच्या मदतीने यूजर्सला फोटो आणि व्हिडीओ पासकोड ठेऊन लॉक करता येणार आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या फोटोंचा स्क्रीनशॉट देखील काढता येणार नाही. तुम्ही तुमचे खास फोटो आणि व्हिडीओ कोणाला दाखवू इच्छित नसाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट फीचर आहे.
गुगल फोटोमध्ये हे खास फीचर देण्यात आलं आहे. कंपनीने अशी माहिती दिली आहे की, या फीचरच्या मदतीने यूजर्सला आता फोटो आणि व्हिडीओ इतरांपासून लपवता येणार आहेत.
सर्च करूनही फोटो दिसणार नाहीत
जे व्हिडीओ आणि फोटो यूजर्स हाइड करतील ते गुगल फोटोच्या मेन ग्रिडमध्ये आणि सर्चमध्येदेखील दिसणार नाहीत. हे फीचर कधी लाँच होणार याची कोणतीही माहिती अद्याप कंपनीने जाहिर केलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार हे खास फीचर पुढल्या वर्षी जूनमध्ये यूजर्ससाठी खुले होणार आहे. तसेच हे फीचर गुगलच्या आगामी स्मार्टफोन पिक्सल 6 सोबत येऊ शकते. त्यानंतर इतर कंपन्यादेखील त्यांच्या स्मार्टफोनमध्ये हे फीचर देऊ शकतात.
स्क्रीनशॉट घेता येणार नाही
Google Photo चे हे फीचर ज्या यूजर्सला त्यांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला दाखवायचे नाहीत अशांना मदतीचे ठरणार आहे. फोटो आणि व्हिडीओला लॉक पासकोड केल्यानंतर ते कोणीही बघू शकणार नाही. हे फोटो गुगल फोटो अॅपच्या मेन ग्रिड सर्चमध्ये देखील दिसणार नाहीत. तसेच स्क्रीनशॉटदेखील काढता येणार नाहीत.