Google Maps : गुगल मॅपवर नवीन फीचर! आता लोकेशन पिन करण्यासाठी वापरा 'ही' पद्धत
Google Maps Feature : Google Maps आपल्या यूजर्सना लोकेशन पिन करण्याचे फीचर्स देते. या फीचरच्या मदतीने कोणतेही लोकेशन पिन केल्यास ते शोधणे सोपे होते.
Google Maps Feature : Google Maps ने नुकतीच नवीन वैशिष्ट्ये लॉन्च केली आहेत. ज्यात अंदाजे टोल किंमत, रिअल टाईम ट्रॅफिक स्थिती यांसारख्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व फीचर्सच्या लॉन्चनंतर असे दिसते की, Google Maps हे केवळ एक नेव्हिगेशन अॅप नाही, जे यूजर्सना पॉईंट टू पॉईंटपर्यंत पोहोचण्यास मदत करते. परंतु, ते त्याहून अधिक आहे. अॅपद्वारे ऑफर केलेल्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे आपण लोकेशन पिन करू शकता.
जेव्हा तुम्हाला एखादे लोकेशन माहित नसेल किंवा ते रस्त्याच्या नेटवर्कपासून दूर असेल तेव्हा हे फीचर काम करेल. ड्रॉपिंग पिन हे फीचर अँड्रॉइड, IOS आणि डेस्कटॉप यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
लोकेशन कसे पिन करावे?
लोकेशन पिन करण्यासाठी, तुम्ही Android, iOS आणि डेस्कटॉपवर Google Maps वर जाऊन या स्टेप्स फॉलो करू शकता.
- सर्वात आधी Google Maps अॅप ओपन करा.
- आता लोकेशनवर लांब टॅप करा, त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी लाल पिन दिसेल.
- आता तुम्हाला खाली निवडलेल्या स्थानासाठी अनेक पर्याय दिसतील.
- त्यानंतर तुम्ही "Direction", "Start" वर टॅप करून नेव्हिगेट करणे सुरू करू शकता.
- यूजर्सना व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पिन लोकेशन "Save" आणि "Share" करण्याचा ऑप्शन देखील दिला जात आहे.
- तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही लेबल ऑप्शनवर क्लिक करून अॅपवर या पिनचे लोकेशन लेबल करू शकता.
तुम्ही तीन श्रेणींमध्ये पिन लोकेशन देखील सेव्ह करू शकता: Favorites, Want to go, and Starred places.
महत्वाच्या बातम्या :