एक्स्प्लोर

Apple WWDC 2022 : अॅपलच्या नव्या मॅकबुकसह नवी ऑपरेटिंग सिस्टमही लॉन्च, iOS 16 पासून Watch OS9 सर्व यादी एका क्लिकवर

अॅप कंपनीने त्यांच्या Apple WWDC 2022 कार्यक्रमात नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व्यतिरिक्त कंपनीने नवीन मॅकबुक एअर देखील लॉन्च केले. तर मॅकसाठी नवा ओएस मॅक ओएस वेन्चुराही समोर आणला आहे.

Apple WWDC 2022 : प्रसिद्ध अॅपल (Apple) कंपनीचा सर्वात मोठा इव्हेंट WWDC 2022 सोमवारी रात्री पार पडला. यावेळी कंपनीने नवनवीन प्रोडक्ट्स लॉन्च केले असून मॅकसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्टम ओएस वेन्चुरा (Apple macOS Ventura) देखील लॉन्च केली आहे. तर या इव्हेंटमध्ये नेमकं काय-काय कंपनीने समोर आणलं ते पाहूया...

या इव्हेंटमध्ये अॅपलनं आयफोन युजर्ससाठी खुशखबर देत iOS 16 सादर केला. कंपनीकडून  iOS 16 मध्ये अनेक छोटे-मोठे बदल करण्यात आलं आहे. iOS 16 नुसार, iPhone मध्ये सर्वात मोठा बदल त्याच्या लॉक स्क्रीनमध्ये करण्यात आला आहे. याअंतर्गत ग्राहकांना iPhone च्या होम स्क्रीनवर वॉलपेपर बदलण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय यूजर्सना आता त्यांच्या iPhone मध्ये नोटिफिकेशन्स अरेंजही करता येणार आहेत. 

नोटिफिकेशनमध्ये बदल 

iPhone यूजर्ससाठी सादर करण्यात आलेल्या iOS 16 मध्ये Live Activities नावाचं एक नवीन स्टाइलचं नोटिफिकेशन देण्यात आलं आहे. याद्वारे युजर्स त्यांच्या वर्कआउट्सशी संबंधित माहिती, तसेच लाईव्ह इव्हेंट्ससोबतच, कॅब राइड्सव्यतिरिक्त इतर अॅक्टिव्हिटींची माहिती मिळत राहील. सध्या, iOS 16 अंतर्गत लॉक स्क्रीनच्या बॉटममध्ये सूचना ठेवल्या जातात.

Apple Pay Later सुविधा

अॅपल डेव्हलपर्स कॉन्फरन्स दरम्यान अॅपल पे लेटर (Apple Pay Later) आणि स्प्लिट द कॉस्ट (Split the Cost) देखील सुरू करण्यात येत आहे. विशिष्ट कालावधीनंतर पेमेंट केलं जाऊ शकतं, ज्या अंतर्गत कंपनी कोणत्याही प्रकारचं अतिरिक्त शुल्क आकारणार नाही. याशिवाय टीव्ही शो, म्युझिक ऐकणं किंवा फिटनेस+ हे मित्रांसह सहज शेअर करता येणार आहे. 

iMessages एडिट करण्याची सुविधा 

अॅपलनं ग्राहकांना त्यांचे iMessages एडिट करण्याची सुविधा दिली आहे. Apple च्या मेसेजिंग अॅपमध्ये (Apple) तीन मोठे फिचर्स जोडण्यात आले आहेत. या सुविधेअंतर्गत, ग्राहक iMessage द्वारे पाठवलेला कोणताही संदेश संपादित करू शकतो किंवा रिकॉल करू शकतो. 

मॅकसाठी नवं macOS Ventura 

यावेळी मॅकसाठी नवा ओएस मॅक ओएस वेन्चुराच्या (Apple macOS Ventura) रुपात सर्वांसमोर आणलं आहे. या ओएसमुळे आता युजर्सना मॅक वापरताना अधिक नवीन गोष्टी करता येणार असून युजर्सना वापर अधिक सोयीस्कर होणार आहे. या मॅकओएस वेन्चुरा ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्टेज मॅनेजर (Stage Mannager) सारखे काही नवीन फिचर्स असणार आहेत. सोबतच अपडेटेड मेल अॅप देखील वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. यामुळे यूजर्सना ईमेलला undo करण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. 

अॅपल वॉचमध्येही नवीन अपडेट

अॅपलनं अॅपल वॉच युजर्ससाठी देखील नवं अपडेट समोर आणलं आहे. आता अॅपल वॉचमध्ये ओएस 9 (OS9) वापरण्यात येणार असून यामुळे वॉचचा वापरात कमालीचा बदल होणार असून वापरकर्त्यांना अधिक सोयीस्कर होणार आहे. अॅपल वॉचच्या नव्या OS9 नुसार आता वॉचमध्ये सिरीचं नवीन इंटरफेअरन्स पाहता येणार आहे. याशिवाय आधीपेक्षा अधिक वर्कआऊट मोड्स आता अॅपल वॉचमध्ये पाहायला मिळणार आहे. तसंच विशेष मेडिकेशन अॅपदेखील आता वॉचमध्ये असणार असून याशिवाय वॉचमध्ये अधिक फेसेस वापरकर्त्यांना पाहायला मिळणार आहेत.   

नवकोरं मॅकबुकही लॉन्च 

यासोबतच या इव्हेंटमध्ये Apple ने आपला नवीन MacBook देखील लॉन्च केला आहे. ज्यामध्ये कंपनीकडून ग्राहकांसाठी अनेक फिचर्सची मेजवाणी देण्यात आली आहे. नव्या MacBook मध्ये कंपनीकडून M2 प्रोसेसर देण्यात आला आहे. Apple नं दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा 5nm डिझाइन केलेला M2 प्रोसेसर 25 अब्ज ट्रान्झिस्टरसह Apple च्या सिलिकॉनची नेक्सट जेनरेशन आहे. असं सांगितलं जात आहे की, M2 प्रोसेसर 10-कोर GPU आहे आणि तो 8-कोर CPU वर काम करतो. हा प्रोसेसर 24GB ची युनिफाइड (Unified) मेमरी हाताळू शकतो. Apple च्या माहितीनुसार, नवीन MacBook Air आणि 13-inch MacBook Pro पुढील महिन्यात निवडक Apple अधिकृत किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kisse Pracharache Seg 04 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget