एक्स्प्लोर

नाशिकमध्ये जन्मलेल्या महिलेचं गुगल डूडल!

कॉर्नेलिया सोराबजी यांची आज 151 वी जयंती आहे. त्याच निमित्ताने गुगलने डूडलद्वारे त्यांना सलामी दिली.

मुंबई: नाशिकमध्ये जन्मलेल्या महिलेचा गुगलने यथोचित सन्मान केला आहे. गुगलने भारताच्या पहिल्या महिला बॅरिस्टर कार्नेलिया सोराबजी यांचं खास डूडल साकारलं आहे. कॉर्नेलिया सोराबजी यांची आज 151 वी जयंती आहे. त्याच निमित्ताने गुगलने डूडलद्वारे त्यांना सलामी दिली. कॉर्नेलिया सोराबजी यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1866 रोजी नाशिकमध्ये पारशी कुटुंबात झाला. सोराबजी या समाजसुधारक होत्याच, शिवाय त्या ख्यातनाम लेखिकाही होत्या. कॉर्नेलिया सोराबजी यांच्या नावे अनेक विक्रम आहेत. त्या भारत आणि लंडनमध्ये कायद्याचा अभ्यास करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. शिवाय तत्कालिन बॉम्बे युनिव्हर्सिटीतून पदवीधर होणारी पहिली महिला होती. तसंच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कायदे अभ्यास करणारी पहिली महिला, ब्रिटीश युनिव्हर्सिटीत कायदे अभ्यास करणारी पहिली भारतीय महिला असे अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. कॉर्नेलिया सोराबजी यांना त्यांच्या पालकांची उत्तम साथ लाभली. त्यांच्या पालकांनी मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी पुण्यात शाळाही सुरु केल्या. त्याच प्रेरणेतून त्यांनी स्वत:च्या मुलीला त्यावेळी उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. सोराबजी 1892 मध्ये कायद्याचा अभ्यास करण्यासाठी परदेशात गेल्या. शिक्षण पूर्ण करुन 1894 मध्ये त्या भारतात परतल्या. त्याकाळी महिलांना वकिली करण्याचा अधिकार नव्हता. विदेशातून कायद्याचं शिक्षण घेऊन आलेल्या सोराबजी यांनी त्याविरोधात आवाज उठवला. त्यांनी महिलांना कायदेशीर सल्ले देण्यास सुरुवात केली आणि कालांतरानं महिलांना वकिली व्यवसायाची दारं खुली करून दिली. महिलांना वकिली करण्यापासून रोखणारा कायदा बदलण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. अखेर 1924 मध्ये तो अन्यायी कायदा रद्द करण्यात आला. 1907 मध्ये कॉर्नेलिया सोराबजी यांनी बंगाल, बिहार, ओदिशा आणि आसाममधील कोर्टात सहाय्यक महिला वकील म्हणून काम पाहिलं. कॉर्नेलिया सोराबजी 1929 मध्ये हायकोर्टातील वरिष्ठ वकील म्हणून सेवानिवृत्त झाल्या. 1954 मध्ये  88 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. मात्र कायदे क्षेत्रात त्यांचं नाव आजही आदराने घेतलं जातं.

महत्त्वाच्या बातम्या

Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
मोठी बातमी : आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
आरोपीचा पाठलाग करताना पोलिसाला हार्टअटॅक, धाडकन जमिनीवर कोसळला, पिंपरीतील धडकी भरवणारी घटना
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
मला अस्वस्थ वाटतंय, गाडीत झोपतो, पोलीस स्टेशनला निघालेल्या सीनियर पीआयला हृदविकाराचा धक्का, गाडीतच मृत्यू!
Harshada Deshmukh On Election : मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
मतपेट्यांमधील चिठ्ठ्या, पेट्यांचे सील फुटल्याचा आरोप; हर्षदा देशमुख विजयाचा विश्वास व्यक्त करताना नेमकं काय म्हणाल्या?
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
घरी लेकीच्या साखरपुड्याची लगबग, आनंदोत्सवावर काळाचा घाला; वीजेचा धक्का लागून आई-वडिलांचा मृत्यू
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वृक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pradeep Purnekar Thane Crime: पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी पकडताच ठाकरे गट- मनसेचे नेते धावून गेले, नौपाडा पोलीस ठाण्यात हायव्होल्टेज ड्रामा
Embed widget