एक्स्प्लोर
अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ‘फूड दोस्ती’ अॅप
पुणे : तुम्ही आम्ही सगळेच हॉटेलिंग तर नेहमीच करतो. शिवाय याच हॉटेलमध्ये गेलं नाही की घेतलेलं अन्न टाकून देणारेही सर्रास दिसतात. पण आता हेच टाळण्यासाठी पुण्यातल्या संजीव नेवे, अनिता नेवे आणि त्यांच्या टीमनं एक खास अॅप तयार केलं आहे. जे डॉटेल मालक आणि गरजूंचा दुवा झालं आहे.
हॉटेलमध्ये जेवायला गेलो की काही ना काही उरवण्याची सवय आता बदलू शकेल आणि हॉटेल मालकांनाही उरलेलं खाणायोग्य अन्न गरजूंपर्यंत पोहोचवता येईल, असा दुहेरी उद्देश साध्य होऊ शकणार आहे. पुण्यातल्या नेवे दाम्पत्यानं ही कल्पना टेक्नोलॉजीच्या मदतीनं साकारली आहे. प्रत्येक हॉटेलसाठी तयार करण्यात आलेल्या या खास सॉफ्टवेअरमुळे हॉटेलमालकांना गरजूंपर्यंत पोहोचता येईलच. पण आपल्याला जसं मॉल्समधल्या शॉपिंगवर पॉईंट्स अॅड होतात, तसेच एक्सट्रॉ पॉईंट्स मिळणार आहेत. पण तेही तु्म्ही तुमच्या ताटातलं अन्न संपूर्ण संपवलं तरच.
हे अॅप असणार 3 घटकांच्या हाती.. पहिला हॉटेलचा मालक.. दुसरा ग्राहक..आणि तिसरा घटक म्हणजे एनजीओ, जे गरजूंपर्यंत अन्न पोहोचवू शकतात. फूड दोस्तीच्या आधारे हे घटक एकमेकांच्या संपर्कात राहू शकतात. हॉटेलमध्ये खाण्यायोग्य अन्न किती आहे याची माहिती फूड दोस्तीवर टाकली की एनजीओपर्यंत ती मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातूनही पोहोचते आणि ग्राहकांना मिळणारे पॉईंट्स ते फूड दोस्ती अॅप असणाऱ्या कोणत्याही दुसऱ्या हॉटेलमध्ये रिडीमही होऊ शकतात.
या अॅपच्या माध्यमातून समोर येऊ लागलाय तो हाफ प्लेट डिमांड कन्सेप्ट. तुम्हाला संपूर्ण डीश जाणार नसेल तर अर्धीच मागवा. पैसे पूर्ण डिशचे द्या. पण निम्मे पैसे पॉईंट्सच्या स्वरूपात तुमच्या अकाऊंटमध्ये अॅड होणार आहेत. पुढच्या वेळी तुम्ही हे पॉईंट्स रिडीम करू शकता.
नुकत्याच लॉन्च झालेल्या अॅपची व्याप्ती भारतभर व्हावी. जेणेकरून प्रत्येक नागरिकाला अन्नाचं महत्व कळेल. तो स्वत: अन्न वाचवण्यासाठी प्रयत्न करेल आणि सोशल मिडीयाच्या माध्यमातून गरजूंपर्यंत अन्न जाईल या उद्देशानं हा उपक्रम सुरू झाला आहे. 12 जणांच्या टीमनं हे अॅप यशस्वीपणे कार्यरत केलं आहे.
प्रगत होत चाललेल्या टेक्नॉलॉजीच्या मदतीनं आता आपल्या पूर्वजांपासून शिकवलेले हेच विचार खऱ्या अर्थानं पुन्हा रूजवले जात आहेत. गरज आहे अशा उपक्रमांना समाजानंच गांभिर्यानं घेण्याची आणि अखेरीस अन्नाची प्रचंज प्रमाणात होणारी नासाडी टाळण्याची.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement