एक्स्प्लोर
फ्लिपकार्टवर बिग शॉपिग डेज: लॅपटॉप, स्मार्टफोनवर जबरदस्त सूट
मुंबई: ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टनं बुधवारपासून पुन्हा एकदा 'बिग शॉपिंग डेज' सेल सुरु केला आहे. हा सेल शुक्रवार म्हणजेच तीन दिवस सुरु असणार आहे.
या सेलमध्ये अनेक वस्तूवंर घसघशीत सूट देण्यात आली आहे. यामध्ये स्मार्टफोन, टॅब, टीव्ही, ऑडिओ सॉल्यूशन, गेमिंग, लॅपटॉप आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तसंच कॅशबॅक ऑफरही आहे.
या सेलमध्ये अनेक ऑफर देण्यात आला एलई 1एस ईको या स्मार्टफोनसाठी सर्वात चांगली ऑपर आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये या स्मार्टफोनवर 8,500 रु. सूट मिळू शकते.
याशिवाय लेनोव्हो वाइब के5 प्लसवर 500 रुपयापर्यंत डिस्कांउट आहे तर एक्सचेंज ऑफरमध्ये या स्मार्टफोनवर 7000 पर्यंत सूट मिळू शकते. तर सॅमसंग गॅलक्सी जे5 आणि गॅलक्सी जे7 या दोन्ही स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरमध्ये अनुक्रमे 11000 आणि 13000
रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. तर मोटो एक्स प्लेवर 2500 रुपयापर्यंत सूट आहे आणि स्मार्टवॉचवर 1000 रुपयापर्यंत सूट आहे.
लेनोव्हो के3 नोट आणि लेनोव्हो वाइब पी1 या स्मार्टफोनवर 1,500 आणि 1,000 रु. पर्यंत सूट आहे. तर एक्सचेंज ऑफरमध्ये 6,500 आणि 5,500 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
तसेच जुन्या लॅपटॉपच्याऐवजी इंटेल पॉवर्ड लॅपटॉप खरेदीवर 10,000 पर्यंत सूट मिळेल. तर एलईडी टीव्ही वर 2000 पर्यंत सूट मिळणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
Advertisement