एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुमच्या जवळच्या ATM बाहेर रांग आहे का? इथे शोधा!
मुंबई: सध्या देशभरात नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. सर्वजण पैशांसाठी एटीएम आणि बँकांबाहेर लांबच लांब रांगा लावत आहेत. अनेकांना एटीएम सेंटरमधील पैसे संपल्याने मोठी पायपीट करावी लागत आहे. पण यावर सोशल मीडियाने मोठा आधार दिला आहे. कारण सोशल मीडियावर काही साईटस् आणि मोबाईल अॅप उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत, ज्या माध्यमातून नागरिकांची होणारी पायपीट आणि त्रास कमी होत आहे.
सोशल मीडियावर गूगलच्या होम पेजवर Find an ATM near you हे ऑप्शन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या ऑप्शनच्या माध्यमातून तुमच्या भागातील एटीएम सेंटरची माहिती देण्यात आली आहे.
या शिवाय तुम्हाला http://atmsearch.in/ या संकेत स्थळावरुनही एटीएमचा शोध घेता आहे. विशेष म्हणजे, या संकेत स्थळावर एटीएम सेंटर सुरु आहे की नाही, तसेच एटीएम सेंटरबाहेर किती गर्दी आहे, याचे अपडेट देण्यात येत आहेत.
याशिवाय अनेकजण https://cashnocash.com/ या वेबसाईटच्या माध्यमातूही एटीएमचा शोध घेत आहेत. या वेबसाईटवर तुमच्या शहराचा पोस्टाचा पिन कोड नंबर डाईल केल्यानंतर, तुमच्या भागांमध्ये कोणते एटीएम सुरु आहे याची सविस्तर माहिती मिळत आहे.
गूगल प्ले स्टोअर्सवरही Walnut App हे मोबाईल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले असून, या माध्यमातूनही तुम्हाला जवळच्या एटीएम सेंटरचा शोध तत्काळ घेता येऊ शकतो. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर जीपीआरएसमुळे तुम्ही जिथे उभे आहात तिथून किती अंतरावर एटीएम सेंटर आहे याची माहिती दिली जाते.
काही दिवसांपूर्वी चेन्नईमधील महापूरानंतर नागरिकांच्या सुविधेसाठी सोशल मीडियाचा अशाप्रकारे आधार घेण्यात आला होता. तेव्हा नोटबंदीच्या निर्णयानंतर याचा एटीएम सेंटरबाहेर रांगा लावणाऱ्या नागरिकांना या अॅप आणि साईटचा सर्वाधिक फायदा मिळू शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement