एक्स्प्लोर
आता OlX वरुनही गाई आणि म्हशींची विक्री
नवी दिल्ली: महानगरांमधलं ऑनलाईन शॉपिंगचं लोण आता ग्रामीण पातळीवरही येऊन ठेपलं आहे. ऑनलाईन शॉपिंगच्या या युगात खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार ऑनलाईन होत असताना आता यामध्ये प्राण्यांचीही भर पडली आहे. कारण हरियाणातल्या एका शेतकऱ्याने चक्क OLX च्या माध्यमातून गाय आणि म्हशींचीही विक्री केली आहे.
हरियाणाच्या सोनीपतमधल्या राकेश खत्री हा शेतकरी गेल्या पाच वर्षांपासून गाई आणि म्हशींचा खरेदी-विक्रीचा व्यापार करतो. त्याने आपल्या या व्यवसायासाठी चक्क OLX च्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा आधार घेतला आहे.
राकेशच्या मते, त्याने OlX च्या माध्यमातून आजपर्यंत 13 गाई आणि म्हशींची विक्री केल्याचा आहे. विशेष म्हणजे या व्यवहारात त्याला तब्बल 30 टक्के अधिक नफा मिळाल्याचे त्याचे म्हणणे आहे.
OLX च्या माध्यमातून गाई आणि म्हशींची खरेदी-विक्री करणारा राकेश खत्री हा एकमेव शेतकरी नाही. तर हरयाणा, पंजाब आणि देशातील इतरही भागातून OLXच्या माध्यमातून हा व्यवहार सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement