एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आता फेसबुकच देणार फ्री वायफाय हॉट-स्पॉटची माहिती
मुंबई : सोशल मीडिया वेबसाईट फेसबुक सध्या एका नव्या फीचरची टेस्टिंग करत आहे. या नव्या फीचरच्या माध्यमातून जवळील वाय-फाय हॉट स्पॉटबद्दल माहिती मिळू शकेल. म्हणजेच तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात, त्या ठिकाणाच्या जवळ कोणतंही फ्री पब्लिक वाय-फाय हॉट स्पॉट असेल तर त्याची माहिती फेसबुक अॅपद्वारे मिळेल.
या नव्या फीचरची टेस्टिंग सुरु असल्याच्या वृत्ताला फेसबुकनेही दुजोरा दिला आहे. सध्या फेसबुककडून हे नवं फीचर नेमक्याच देशांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. व्हेंचर बीटला माहिती देताना फेसबुकच्या प्रवक्त्याने सांगितले, "लोकांना त्यांच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळींसोबत जोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठीच नवे फीचर्स आहेत."
एका टेक पोर्टलने या नव्या फीचरचे स्क्रीनशॉटही प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये दिसतं की, फेसबुक अॅप मेन्यूमध्ये Enable Find Wi-Fi ऑप्शन स्पष्टपणे दिसतो. हा ऑप्शन ऑन केल्यानंतर यूझर्सना जवळील फ्री वाय-फाय हॉट-स्पॉटची माहिती मिळू शकेल.
लोकेशनची माहिती द्यावी लागणार
फेसबुकचं हे नवं फीचर वापरण्यासाठी यूझर्सना आपल्या लोकेशनबाबत माहिती सबमिट करावी लागेल. फोनमधील लोकेशनचा ऑप्शन एनेबल करावा लागले. कंपनीच्या दाव्यानुसार, डिव्हाईस लोकेशनच्या आधारावरच तुम्हाला वाय-फायची माहिती मिळेल.
फेसबुकमधील या नव्या फीचरसाठी अँड्रॉईड यूझर्सना आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण सध्या आयफोनमध्येच हे फीचर देण्यात आले आहे आणि तेही मोजक्याच देशामध्ये.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement