Avatars | फेसबुकचं नवं भन्नाट फिचर
फेसबुकने भारतातील युजर्ससाठी नवं फिचर सादर केलं आहे, यात व्हर्च्युअल कार्टून म्हणजेच अनिमेटेड कॅरेक्टर तयार करू शकता.
फेसबुक आपल्या युजर्ससाठी नेहमीचं नवं नवीन फिचर्स घेऊन येतं, आणि पुन्हा एकदा मजेशीर भन्नाट असं फिचर घेऊन आलंय, ज्याचं नाव 'अवतार' आहे.
विशेषतः भारतीयांना लक्षात घेऊन इथल्या वेगवेगळ्या वेशभूषेसाठी खूप सारे चेहरे, केशभूषा, कपडे, अलंकार अश्या क्रिएटिव्हचं भंडार इथं तयार केलं आहे. एकदा का हे अवतार बनवलं की याच्या मदतीने आपल्या चेहऱ्याच्या स्टिकर्सचा वापर एकमेकांना मेसेज पाठवण्यासाठी सोबतच कमेंट्स मध्येही शेअर करण्यासाठी करू शकता. याचा आनंद आज फेसबुक वॉल वर कित्तेक मंडळी घेताना दिसत आहे.
यापूर्वी स्नॅप चॅट, Hike सारख्या या Application वर देखील हे फिचर आले आणि अल्पावधीतच या Avatar ने युजर्सच्या मनावर पकड मिळवली आणि हेच अवतार फिचर फेसबुक आपल्या युजर्स साठी घेऊन येण्याच्या तयारीत होतं, आणि अखेर भारतीयांसाठी हे फिचर अखेर लॉन्च झालं आहे.
इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी सेलिब्रिटी मालामाल, कोटींची कमाई, हे कलाकार अव्वल
असं तयार करा तुमचं अवतार!सर्वप्रथम मोबाईल मधील फेसबुक app हे लेटेस्ट वर्जन मध्ये अपडेट आहे का पाहावं नसेल तर अपडेट करावं तरच या फिचर चा ऑप्शन दिसेल. App मधील 'हैमबर्गर' आयकॉन मध्ये जाऊन 'See More' वर टॅप केल्यावर नवी विंडो दिसेल तिथं पहिलाच ऑप्शन हा 'Avatars' चा दिसेल, किंवा तुमच्या फ्रेंडस ने हे वापरलं आहे अशी पोस्ट वॉल वर दिसली तर त्या खाली 'Try It' असा ऑप्शन दिसेल यावर टॅप करून आपापल्या आवडी नुसार स्वतःच्या अनिमेटेड कॅरेक्टरचा चेहरा, केस, रंग तसेच कपडे इत्यादी ची भली मोठी ऑप्शन्स येतील ही वापरून आपल्या चेहऱ्यास अनुसरून हे अवतार तुम्ही तयार करू शकता. एकदा का हे अवतार तयार झालं की त्याची वेगवेगळी स्टिकर्स पाहायला मिळतील.
फेसबुकचं भन्नाट फिचर सगळ्या युजर्सच्या पसंतीस पडत आहे, तरी तुम्हीही आजूनही हे वापरलं नसेल तर आवर्जून वापरून पाहायला हरकत नाही. रंगभेदावरून होणाऱ्या टिकेमुळे एकीकडं Fair & Lovely मधून 'फेयर' गायब होत असतानाच काही नेटिझन्स ना यातील स्वतःचे चेहऱ्याचे काळे-गोरे रंग निवडीच स्वातंत्र्य पुन्हा सौंदर्याची संकल्पना रंग भेदावर येऊ नये हीच अपेक्षा.
India China Dispute | TikTok चा खटला लढवण्यास मुकुल रोहतगींपाठोपाठ अभिषेक मनुसिंघवींचा नकार