एक्स्प्लोर

इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी सेलिब्रिटी मालामाल, कोटींची कमाई, हे कलाकार अव्वल

इंस्टाग्राम हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, पण अनेकांसाठी हे कमाईचं एक महत्वाचं साधनही आहे. तुम्हालाही आश्चर्य वाटेल की इन्स्टाग्रामवरुन कोण किती कमाई करतं याचे आकडे ऐकून..

मुंबई :  इन्स्टाग्रामवर एकेक पोस्ट करुन हे सेलिब्रिटी कोट्यवधी रुपये कमावतात. आपले बॉलिवूड स्टार एकेका सिनेमासाठी जेवढं मानधन घेतात, तेवढे पैसे तर या इन्स्टाग्राम सेलिब्रिटीला इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करुन  मिळतात. सोशल मीडिया क्षेत्रातली एक कंपनी असलेल्या हॉपर एचक्यू (Hopper HQ) ने जगभरातील इन्स्टाग्रामवर सर्वाधिक श्रीमंत सेलिब्रिटींची यादी (Instagram Rich List 2020) प्रकाशित केलीय. ही कंपनी दरवर्षी ही यादी अपडेट करते. यावर्षीच्या यादीत हॉलिवूडचा अभिनेता, निर्माता आणि निवृत्त कुस्तीपटू ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson) पहिल्या क्रमांकावर आहे. मागच्या वेळी म्हणजे 2019 च्या यादीत त्याचा सहावा क्रमांक होता. तर 2019 मध्ये पहिल्या क्रमांकावर अमेरिकेतली टीव्ही सेलिब्रिटी केली जेनर (Kylie Jenner) होती, यावर्षी तिला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय. ड्वेन जॉन्सनने इन्स्टाग्रामवर 18 कोटी 73 लाख फॉलोअर्स आहेत तर तर एका इन्स्टा पोस्टची त्याची कमाई दहा लाख पंधरा हजार अमेरिकी डॉलर्स आहे. भारतीय रुपयांमध्ये आजच्या विनिमय दरानुसार सात कोटी 66 लाख रुपये होतात. हॉपर एचक्यू डॉट कॉमच्या टॉप 100 सेलिब्रिटी लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या केली जेनरचे  18 कोटी 15 लाख फॉलोअर्स आहेत, तिच्या एका इन्स्टा पोस्टची कमाई 9 लाख 86 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात सात कोटी 44 लाख रुपये आहे. जगभरातील टॉप इन्स्टा सेलिब्रिटीच्या एकेका पोस्टचे हे कमाईचे आकडे डोळे दीपवणारे आहेत. हे वाचल्यावर तुम्हाला साहजिकच भारतीय सेलिब्रिटींचं काय हे जाणून घ्यायला आवडेल. त्याची उत्तरे हॉपर एचक्यूच्या यादीत आली आहेत. त्यानुसार टॉप 100 सेलिब्रिटींच्या या यादीत 26 व्या स्थानावर आपला क्रिकेटवीर विराट कोहलीने (Virat Kohli) स्थान पटकावलंय. विराट कोहलीचे 6 कोटी 42 लाख फॉलोअर्स असून त्याच्या एका इन्स्टा पोस्टची कमाई 2 लाख 96 हजार डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये रु. 2,23,33,954 (दोन कोटी 23 लाख 33 हजार 954 रुपये - आजच्या विनिमय दरानुसार) आहे. या यादीत आणखी एक भारतीय नाव आहे, पण त्या सेलिब्रिटीचं वास्तव्य आता भारतात विरळच असतं. या यादीत 28 व्या स्थानावर अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आहे. 5 कोटी 40 लाख फॉलोअर्स असलेल्या प्रियांका चोप्राच्या एका इन्स्टा पोस्टची कमाई  2 लाख 89 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात दोन कोटी 18 लाख रुपये आहे. हॉपर एचक्यूच्या या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोर्तुगालचा फुटबॉल खेळाडू क्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आहे. तब्बल 22 कोटी 48 लाख फॉलोअर्स असलेल्या क्रिस्तियानोची एका इन्स्टा पोस्टची कमाई भारतीय चलनात 6 कोटी 71 लाख रुपये आहे. महत्वाचं म्हणजे हॉपर एचक्यूने जारी केलेल्या 2019 च्या यादीतही क्रिस्तियानो तिसऱ्याच क्रमांकावर होता. हॉपर एचक्यूच्या टॉप 100 इन्स्टा सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावरही काहीच बदल झालेला नाही. 2019 च्या यादीतला चौथा आणि पाचवा क्रमांक यावेळी कायम आहे. चौथ्या क्रमांकावर आहे कर्दाशिन भगिनींमधील किम कर्दाशिन तर पाचव्या क्रमांवर अरायना ग्रांडे. त्यांची एका इन्स्टा पोस्टची कमाई भारतीय चलनात अनुक्रमे सहा कोटी 47 लाख आणि 6 कोटी 43 लाख आहे. हॉपर एचक्यूच्या या टॉप सेलिब्रिटींच्या यादीत आणखी एक भारतीय नाव आहे. पण त्याला पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवता आलेलं नाही. हॉपर एचक्यूच्या यादीत 153 व्या क्रमांकावर असलेल्या या सेलिब्रिटीचं नाव आहे वरुण आदित्य. भारताचा वाईल्डलाईफ फोटोग्राफर असलेल्या वरुण आदित्यचे इन्स्टाग्रामवर आठ लाख फॉलोअर्स आहेत तर त्याच्या एका पोस्टची कमाई चार लाख रुपये आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget