एक्स्प्लोर

Facebook नाव बदलण्याच्या तयारीत! काय आहे नेमकं कारण?

फेसबुकसोबतच कंपनी आपले इतर प्रॉडक्ट जसे की, Instagram, WhatsApp, Oculus यांचेही नाव बदलण्याची घोषणा करु शकते.

Facebook Plans To Change Its Name :  तुम्ही दिवसरात्र वापरत असणाऱ्या फेसबुकचं नाव बदलण्याची शक्यता आहे. विश्वास बसत नाही ना... पण होय! हे खरं आहे... मीडिया रिपोर्ट्सनुसार, Facebook Inc कंपनी आपल्या युझर्सपुढे नव्या अवतारात येण्याची तयारीत आहे. पुढील आठवड्यात कंपनी आपलं नाव बदलण्याची योजना आखत आहे, असं The Verge ने सुत्रांच्या हवाल्यानं मंगळवारी वृत्त दिलं आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सभेत नाव बदलण्याचा प्रस्ताव सादर करणार आहेत. लवकरच कंपनी नव्या नावाचं अनावरण करु शकते. मात्र, कंपनीच्या एका प्रवक्त्यानं यावर बोलण्यास नकार दिला. तो म्हणाला की, कोणत्याही तर्क अथवा अफवांवर बोलू शकत नाही. 

रिपोर्टमध्ये असेही म्हटलेय की, फेसबुकसोबतच कंपनी आपले इतर प्रॉडक्ट जसे की, Instagram, WhatsApp, Oculus यांचेही नाव बदलण्याची घोषणा करु शकते.  दरम्यान, जुलैमध्ये झालेल्या earning कॉलमध्ये बोलताना फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले होते की, कंपनीचं भविष्य 'metaverse'मध्ये आहे. अमेरिकेतील संसदेत फेसबुकवरुन रणकंद झाल्यानंतर नाव बदलण्याची बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील दोन्ही पक्षांनी फेसबुकवर जाहीर राग व्यक्त केला होता. हे सर्व सुरु असतानाच कंपनीनं आपल्या नावात बदल करण्यावर काम सुरु केल्याचं बोललं जात आहे. 

फेसबुक सध्या सोशल मीडियापुरतं मर्यादीत न राहाता त्यापुढे जाण्याच्या तयारीत आहे. रविवारी 18 ऑक्टोबर रोजी कंपनीनं युरोपमध्ये 10 हजार जणांनाना नोकरी देण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं. जेणेकरुन कंपनीला मेटावर्स तयार करण्यात मदत मिळेल. कंपनी मेटावर्सलाही भविष्य मानत आहे. महिनाभरापूर्वीच कंपनीनं AR (augmented reality) आणि VR (virtual reality) चीफ आंद्रे बोसवर्थ यांना चीफ टेक्नोलॉजी आधिकारी म्हणून बढती देणार असल्याची घोषणा केली होती.  फेसबुकनं VR आणि AR मध्ये  मोठी गुंतवणूक केली आहे. जवळपास तीन अरब यूजर्सला जोडण्याची योजना आहे.

संबधित बातम्या :

Facebook Stock : काही तासातच मार्क झुकरबर्गने गमावले 45,555 कोटी रुपये, श्रीमंतांच्या यादीतील स्थानही घसरलं

Facebook Stock : 7 तासांचा बिघाड...44 हजार कोटींचा फटका Special Report

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
GST Collection: जीएसटीनं केंद्र सरकारची तिजोरी भरली,  डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटी तिजोरीत जमा
जीएसटीनं केंद्र सरकारच्या तिजोरीत भर, डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटींचं कलेक्शन, आकडेवारी समोर
सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Full Speech : उत्तर गडचिरोली नक्षलवाद मुक्त, फडणवीसांचं गडचिरोलीत भाषणVinod Kambli on Cricket : सचिन आणि मी शिवाजीपार्कवर भेटलो, मी पुन्हा येणार! क्रिकेट खेळणार!ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 01 January 2025Vinod Kambli Plays Cricket : भारताची जर्सी, हातात क्रिकेट बॅट; हॉस्पिटलमध्ये कांबळीचे चौकार-षटकार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
सरपंच हत्याप्रकरणात SIT स्थापन, IPS बसवराज तेलींसह 10 जणांची टीम; बीडमधील तपासाला वेग
GST Collection: जीएसटीनं केंद्र सरकारची तिजोरी भरली,  डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटी तिजोरीत जमा
जीएसटीनं केंद्र सरकारच्या तिजोरीत भर, डिसेंबरमध्ये 1.77 लाख कोटींचं कलेक्शन, आकडेवारी समोर
सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
सरकारकडून वीजबील थकवलेल्यांना पुन्हा अभय; घरगुती-व्यवसायिक ग्राहकांना 31 मार्चपर्यंत मुदतवाढ
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Embed widget