(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Facebook Fined : ब्रिटन सरकारचा फेसबुकला दणका! माहिती अधिकाराचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल 50 मिलियन युरोचा दंड
इंग्लंडमध्ये फेसबुकला तब्बल 5 कोटी 5 लाख पौंड म्हणजेच साधारण 7 कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजेच साधारण 500 कोटी रुपयांचा दंड आकरण्यात आला आहे
नवी दिल्ली: इंग्लंडमध्ये गोपनीय माहितीचे उल्लंघन केल्याने फेसबुकला (Facebook) दंड ठोठावला आहे. इंग्लंडने तब्बल 5 कोटी 5 लाख पौंड म्हणजेच साधारण 7 कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय रुपयात सांगायचे झाले तर साधारण 500 कोटी रुपयांचा दंड आकरण्यात आला आहे. ही माहिती एएफपी या वृत्त संस्थेने दिली आहे.
The UK fines Facebook over £50 million for information breach, reports AFP pic.twitter.com/gK4anUQFhK
— ANI (@ANI) October 20, 2021
ब्रिटनच्या कॉम्पिटिशन आणि मार्केट ऑथोरिटीने म्हटंल आहे की, "फेसबुकने जाणीवपूर्वक कायद्याचे पालन केले नाही. त्यामुळे हा दंड आकारण्यात येत आहे आणि कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही. अनेकवेळा सूचना देऊन देखील फेसबुकने आवश्यक ती माहिती पुरवली नाही. आवश्यक त्या कायद्यांचे पालन केले नाही. या सगळ्या गोष्टीवरून लक्षात येते की, फेसबुकने जाणीवपूर्वक कायद्याचे उल्लंघन केले आहे."
कॉम्पिटिशन आणि मार्केट ऑथोरिटीने सांगितले आहे की, माहितीच्या उल्लंघनासंबधी मागितलेली माहिती पुरवावी यासाठी आम्ही वेळोवेळी फेसबुकला आदेश दिले. या संबंधी फेसबुकला दोन वेगवेगळ्या न्यायालयाने आदेश देखील दिले होते. तरी देखील फेसबुकने त्या आदेंशांचे पालन न करता कायद्याचे उल्लंघन सुरूच ठेवले. कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही हा संदेश देण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. फेसबुकने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, कॉम्पिटिशन आणि मार्केटच ऑथोरिटीने दिलेल्या अन्यायी निर्णयाशी सहमत नाही.