एक्स्प्लोर

Drone कसे काम करते? देशात यासंदर्भात काय गाईडलाइन्स आहेत? नियम मोडल्यास शिक्षा काय? सर्व माहिती जाणून घ्या

जम्मूमधील हल्ल्यानंतर भारतात ड्रोनच्या वापराबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत.ड्रोन कसे काम करते? यामुळे काय धोका आहे? आणि देशातील ड्रोनसंदर्भात सरकारच्या काय गाईडलाइन्स आहेत? जाणून घ्या.

अलीकडे जम्मू-काश्मीरमध्ये जम्मूच्या हवाई दलाच्या स्टेशनवर दोन ड्रोनने स्फोट घडवून आणला होता. भारतात ड्रोनच्या मदतीने हल्ला झाल्याची ही पहिली घटना आहे. जरी यापूर्वी अनेक वेळा पाकिस्तानला लागून असलेल्या सीमांवर ड्रोन पाहिले गेले आहेत. अगदी सीमेवरून ड्रोनद्वारे अंमली पदार्थांची तस्करीची अनेक प्रकरणे पंजाबमध्येही नोंदली गेली आहेत, पण यावेळी जम्मूमधील घटनेने सुरक्षा दले आणि सरकारला चिंतेत टाकलं आहे. या हल्ल्यानंतर भारतात ड्रोनच्या वापराविषयी चर्चा सुरू झाली आहे. या अहवालात जाणून घ्या ड्रोन कसे काम करते. यामुळे काय नुकसान होऊ शकते आणि देशातील ड्रोनसंदर्भात सरकारचे मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत.

सोप्या भाषेत ड्रोन काय आहे?
ड्रोनला यूएव्ही (UAV) म्हणजेच मानवरहीत हवाई वाहन (Unmanned aerial vehicles) किंवा आरपीएएस (RPAS) म्हणजेच दूरस्थ पायलट एरियल सिस्टीम्स (Remotely Piloted Aerial Systems) असेही म्हणतात. हे असे डिव्हाइस आहे ज्यात एचडी कॅमेरे लावलेले असतात. यात ऑनबोर्ड सेन्सर आणि जीपीएस यंत्रणा आहे. हे एका सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. त्याच्या आजूबाजूला 4 रोटर्स (पंखे) आहेत, ज्याच्या मदतीने ते हवेत उडते. सामान्य भाषेत याला मिनी हेलिकॉप्टर देखील म्हणतात. अशा ड्रोनचे वजन 250 ग्रॅम ते 150 किलोग्रॅमपेक्षा जास्त असू शकते.

ड्रोन ऑपरेट कसे होते?
ड्रोन उडवण्यासाठी सॉफ्टवेअर, जीपीएस आणि रिमोट हे सर्वात महत्वाचे आहे. ड्रोन केवळ रिमोटद्वारे ऑपरेट आणि नियंत्रित केले जातात. ड्रोनवर बसविलेल्या रोटर्सचा वेग रिमोटच्या जॉयस्टिकवरुन नियंत्रित केला जातो. जीपीएस हा एक प्रकारे ड्रोनचे सुरक्षा कवच आहे, जे अपघात होण्यापूर्वी ऑपरेटरला सावध करते. ड्रोन केवळ जीपीएसच्या मदतीने उडते आणि त्याला उड्डाण करण्यासाठी मोकळ्या जागेची आवश्यकता असते.

ड्रोन कुठे आणि का वापरले जातात?
1991 च्या आखाती युद्धामध्ये अमेरिकन सैन्याने पहिल्यांदाच आपल्या शत्रूला लक्ष्य करण्यासाठी ड्रोनचा वापर केला. 

सध्याचा वापर..

  • वस्तूंचे ई-कॉमर्स वितरण
  • फोटो काढणे
  • व्हिडिओ शूट करण्यासाठी
  • राष्ट्रीय महामार्ग मॅपिंग
  • रेल्वे ट्रॅक मॅपिंग
  • जंगलांवर नजर ठेवण्यासाठी
  • कृषी आणि इतर कामांशी संबंधित कामांसाठीही याचा वापर होतो. औषध फवारवी वैगेरे..
  • दहशतवादी कारवायांसाठी ड्रोनचा वापर केला जात आहे?

हवेत ड्रोन इतक्या उंचीवर उडू शकतात की जमिनीवर उभी असलेली एखादी व्यक्ती त्याला पाहू शकणार नाही. जम्मूमध्ये झालेल्या स्फोटानंतर चर्चेत आलेले ड्रोन अनेक दहशतवादी संघटना वापरत असल्याचे समोर आले आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये असोसिएशन ऑफ युनायटेड स्टेट्स आर्मीने (AUSA) प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे की इस्लामिक स्टेटने दहशतवादासाठी ड्रोनची पहिली यशस्वी चाचणी घेतली होती.

2013 मध्ये अल-कायदाने पाकिस्तानमध्ये ड्रोनचा वापर करून अनेक दहशतवादी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याला यश आले नाही. 2016 पासून, इस्लामिक स्टेट इराक आणि सीरियामध्ये हवाई हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहे. 2019 मध्ये युरोपियन युनियनचे सुरक्षा आयुक्त ज्युलियन किंग यांनी इशारा दिला की दहशतवादी संघटना युरोपियन शहरे नष्ट करण्यासाठी ड्रोनचा वापर करू शकतात.

ड्रोन किती प्रकारचे असतात?

  • नॅनो ड्रोन्स - 250 ग्रॅम पर्यंत
  • मायक्रो ड्रोन - 250 ते 2 किलो
  • मिनी ड्रोन्स - 2 किलो ते 25 किलो
  • लहान ड्रोन्स - 25 किलो ते 150 किलो
  • मोठे ड्रोन्स - 150 किलोपेक्षा जास्त

देशातील ड्रोनसंदर्भात कोणती मार्गदर्शक तत्त्वे आहेत?

  • नागरी उड्डयन मंत्रालयाने देशात उड्डाण करणारे हवाई परिवहनांवर अनेक निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध ड्रोनचे वजन आणि आकारानुसार अनेक प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत.
  • नॅनो ड्रोन्स - याला उडवण्यासाठी आपल्याला परवाना लागणार नाही.
  • मायक्रो ड्रोन्स - हे उडवण्यासाठी UAS Operator Permit-I कडून परवानगी घ्यावी लागेल आणि ड्रोन पायलटला SOP चा अवलंब करावा लागेल.
  • यापेक्षा मोठे ड्रोन उड्डाण करण्यासाठी डीजीसीएकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच, जर तुम्हाला प्रतिबंधित ठिकाणी ड्रोन उडवायचा असेल तर यासाठी तुम्हाला डीजीसीएची परवानगी घ्यावी लागेल. परवानगीशिवाय ड्रोन उडविणे बेकायदेशीर आहे आणि ड्रोन ऑपरेटरला मोठ्या दंडाच्या शिक्षेची तरतूदही आहे.

ड्रोन उड्डाण करण्यासाठी परवाना कसा मिळवायचा?

नॅनो ड्रोनशिवाय कोणत्याही प्रकारचे ड्रोन उडवण्यासाठी परवाना किंवा परमिट घेणे आवश्यक आहे.

ड्रोनसाठी दोन प्रकारचे परवाने दिले जातात

  • प्रथम- विद्यार्थी रिमोट पायलट परवाना
  • दुसरा- रिमोट पायलट परवाना

वय :
हे दोन्ही परवाने मिळविण्यासाठी ड्रोन ऑपरेटरचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त 65 वर्षे असावे.

शिक्षा
परवान्यासाठी ऑपरेटर कमीतकमी दहावी पास असणे आवश्यक आहे किंवा दहावीच्या समकक्ष असणे आवश्यक आहे, त्याच्याकडे मान्यताप्राप्त मंडळाची पदवी असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या व्यक्तीला डीजीसीए स्पेसिफाइड वैद्यकीय परीक्षा देखील पास करावी लागेल. परवान्यासाठी आपली पार्श्वभूमी तपासणी केली जाते.

विनापरवाना ड्रोन उडवल्यास काय शिक्षा आहे?

  • विनापरवाना ड्रोन उडवल्यास 25000 रुपयांचा दंड आहे.
  • नो-ऑपरेशन झोनमध्ये ड्रोन उडवल्यास 50 हजार रुपये दंड.
  • ड्रोनचा थर्ड पार्टी विमा असणे देखील आवश्यक आहे, तो नसेल तर 10000 रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
Solapur farmers protest: सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
Embed widget