एक्स्प्लोर
कानाला लावलेल्या हेडफोनचा स्फोट, महिलेचा चेहरा भाजला

बीजिंग : विमानात प्रवास करताना हेडफोन लावणं महिलेला चांगलंच महागात पडलं. कानाला लावलेला हेडफोनचा स्फोट झाल्याने महिलेचा चेहरा भाजला. बीजिंगहून मेलबर्नला जाणाऱ्या विमानातील ही घटना आहे. महिलेने बॅटर संचलित हेडफोन कानाला लावलेले होते. या हेडफोनचा अचानक स्फोट झाला. त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी महिलेवर प्रथोमपचार केले, अशी माहिती आहे. https://twitter.com/HuffingtonPost/status/842012818010431488 प्रवाशांनी बॅटरी संचलित उपकरणांपासून विमान प्रवासात सावध रहावं, असं आवाहन या घटनेनंतर ऑस्ट्रेलिया सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलं आहे.
आणखी वाचा























