एक्स्प्लोर
नव्या आयफोनची मागणी घटली, कित्येक युनिट विक्रीविना पडून
विकेंड सेलला निम्म्यापेक्षा कमी फोनची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. आयफोनचे कित्येक युनिट विक्रीविना पडून आहेत.
मुंबई : अॅपलचे नवे आयफोन आणि आयफोन XS ची मागणी भारतात कमी झाल्याचं समोर आलं आहे. भारतातील अनेक विक्रेत्यांनीही ही गोष्ट मान्य केली आहे. विकेंड सेलला निम्म्यापेक्षा कमी फोनची विक्री होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
यापूर्वी आयफोन खरेदी करण्यासाठी रांगा लागलेल्या असायच्या. मात्र यावेळी चित्र वेगळं आहे. अॅपलने लाखांच्या संख्येने युनिट भारतात पाठवले आहेत, जेणेकरुन फोनची विक्री करताना तुटवडा निर्माण होणार नाही. पण यावेळी विक्रीही वाढलेली नाही आणि ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
अॅपलचे नवे आयफोन येताच जुन्या मॉडलच्या किंमतीत भरघोस कपात
अॅपल प्रीमियम रिसेलरचे देशभरात जवळपास 1500 स्टोअर्स आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते, या स्टोअर्समध्ये 40 ते 50 टक्के स्टॉक विक्रीविना पडून आहे. गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन 8 ची मागणी या वर्षीच्या मॉडेल्सपेक्षा किती तरी अधिक आहे. भारतात यावेळी आयफोन XS आणि XS मॅक्सची विक्री केवळ 50 ते 60 टक्के झाली, जी गेल्या वर्षीच्या आयफोन X ची केवळ तीन दिवसात झाली होती. तुलनेने आयफोन XS ची मागणी जास्त आहे, जो 256 जीबी व्हेरिएंटमध्ये आहे. फोनची किंमत 1 लाख 24 हजार 900 रुपये आहे. अॅपलने आयफोन XS आणि XS मॅक्स गेल्या शुक्रवारी भारतात लाँच केला. तर गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन X ची किंमत 89 हजार रुपयांपासून ते 1.02 लाखापर्यंत होती. संबंधित बातमी :62 हजारांच्या आयफोनची 'माती' झाली
आयफोन Xs मॅक्स वि. सॅमसंग गॅलक्सी नोट 9, कोणता फोन चांगला?
अॅपल प्रेमींची प्रतीक्षा संपली; आयफोन, अॅपल वॉच 4सह इतर डिव्हाईसही लाँच
अॅपल Xs आणि Xs मॅक्स लाँच, जगातला सर्वात वेगवान फोन असल्याचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement