(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Facebook : फेसबुकवर लवकरच येणार नवीन फिचर; यूजर्स एकाच अकाऊंटवरून 5 प्रोफाईल तयार करू शकतील
Facebook Update : फेसबुकच्या नवीन फिचरमुळे यूजर्स एकाच फेसबुक अकाऊंटवरून पाच प्रोफाइल तयार करू शकतील.
Facebook Update : मेटाने (Meta) फेसबुकसाठी (Facebook) एक मोठे फीचर जाहीर केले आहे. या नवीन वैशिष्ट्यामुळे, यूजर्स एकाच फेसबुक अकाऊंटवरून पाच प्रोफाईल तयार करू शकतील. कंपनीने हे नवीन फीचर आणले आहे. फेसबुकचा वापर अधिकाधिक लोकांनी करावा या उद्देशाने कंपनी सतत फेसबुकमध्ये नवीन अपडेट घेऊन येत असते. यावेळी कंपीनीने प्रोफाईलचे फिचर सुरु करणार आहे. फेसबुकच्या या नव्या फीचरची सध्या टेस्टिंग सुरू आहे. अहवालानुसार, चाचणीमध्ये सहभागी असलेल्या बीटा वापरकर्त्यांना एकाच खात्यातून 5 प्रोफाईल तयार करण्याची सुविधा दिली जात आहे. अतिरिक्त प्रोफाईलमध्ये, यूजर्सना त्यांचे खरे नाव देखील नमूद करण्याची आवश्यकता नाही. सोप्या शब्दात समजून घ्यायचे झाल्यास, याचा अर्थ असा की, तुम्ही तुमची ओळख लपवूनही एखाद्या पोस्टवर टिप्पणी करू शकाल.
नियमांचे उल्लंघन केल्यास मुख्य खाते देखील धोक्यात येईल
जर तुम्ही तुमच्या इतर प्रोफाइलसह पॉलिसीचे उल्लंघन केले तर तुमचे मुख्य खाते देखील धोक्यात येऊ शकते. या नवीन वैशिष्ट्याचे वर्णन करताना, मेटाने पुढे सांगितले, "यामुळे यूजर्सना वेगळ्या ओळखीसह फीडची एक वेगळी श्रेणी मिळेल. याचाच अर्थ तुम्हाला जर खेळाची, गेमिंगची आवड असेल त्याचबरोबर प्रवासातही तुमचा रस असेल तर तुम्ही एकाच वेळी हे दोन्ही प्रोफाईल वापरू शकता.
Metaverse आणि Web3 साठी Wallet लाँच
आत्ताच गेल्या महिन्यात Meta ने Metaverse आणि Web3 साठी त्याचे वॉलेट सादर केले. मेटाच्या या पेमेंट सिस्टमचे नाव मेटा पे आहे. हा एक सार्वत्रिक पेमेंट मोड आहे. याद्वारे मेटाव्हर्स व्यतिरिक्त, सामान्य पेमेंट देखील करता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की Meta Pay हा फेसबुक पेचा नवीन प्रकार आहे.
Meta Pay बद्दल, Meta चे CEO मार्क झुकेरबर्ग यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, "Web3 च्या जगात मालकीवरून मोठी लढाई सुरू आहे. ही लढाई देखील महत्त्वाची आहे. येत्या काळात, वापरकर्ते डिजिटल कपडे घालण्यास सुरुवात करतील. येत्या काळात वेळा, खरेदी Metaverse मध्ये देखील केली जाईल, ज्यासाठी पेमेंट सिस्टम आवश्यक असेल.
महत्वाच्या बातम्या :