एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ब्लॅकबेरीचा KEYone स्मार्टफोन लाँच, किंमत 39,990 रुपये
ब्लॅकबेरीनं मच अवेटेड स्मार्टफोन KEYone आज भारतात लाँच केला असून याची किंमत 39,990 रुपये आहे.
मुंबई : ब्लॅकबेरीनं आज (मंगळवार) आपला नवा स्मार्टफोन KEYone भारतात लाँच केला आहे. ब्लॅकबेरीची खासियत म्हणजे QWERTY की-बोर्ड. या स्मार्टफोनमध्ये देखील की-बोर्ड देण्यात आला आहे.
ब्लॅकबेरीच्या या नव्या स्मार्टफोनची किंमत 39,990 रुपये आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट अॅमेझानवर 8 ऑगस्टपासून हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
या स्मार्टफोनसोबत जर यूजरनं व्होडाफोनचं सिम खरेदी केल्यास व्होडाफोनकडून यूजर्संना 75 जीबी डेटा मिळणार आहे.
ब्लॅकबेरीच्या KEYone स्मार्टफोनचे खास फीचर :
- या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंच स्क्रिन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 1080x1920 पिक्सल आहे.
- हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.1 नॉगट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असणार आहे.
- 64 जीबी व्हेरिएंटचा हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे.
- यामध्ये स्नॅपड्रॅगन 625 SoC प्रोसेसर असून 4 जीबी रॅम देण्यात आली आहे.
- या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे.
- यात 3505 mAh बॅटरी असणार आहे. तसेच वाय-फाय, 4जी, जीपीएस हे फीचर देखील असणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
बॉलीवूड
Advertisement