एक्स्प्लोर
अॅपलकडून जबरदस्त ऑफर, आयपॅड प्रो, आयफोन 7 वर मोठी सूट
मुंबई : अॅपलचे सर्वच प्रॉडक्ट्स महागडेच असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही खरेदी करता येत नाही. मात्र, आता अॅपल कंपनीने ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. आयफोन खरेदी करण्यासाठी कॅशबॅक ऑफर देण्यात आली आहे.
आयफोन 7, 7 प्लस आणि आयपॅड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अॅपलकडून मोठी सवलत मिळणार आहे. सिटी बँकच्या सहकार्याने अॅपलने ही ऑफर आणल्याने, ग्राहकांकडे सिटी बँकचं कार्ड असणं आवश्यक असेल.
आयपॅड प्रो आणि आयफोन 7 किंवा 7 प्लस एकत्र खरेदी केल्यास 23 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल, अशी ऑफर आहे. अॅपल कंपनी आयपॅड एअर 2 सोबत आयफोन 7 किंवा 7 प्लस खरेदी करणाऱ्यांनाही 18 हजार रुपये कॅशबॅक देत आहे. आयपॅड मिनी 2 आणि 4 मॉडेल्ससोबत आयफोन 7 किंवा 7 प्लस खरेदी करणाऱ्यांना 17 हजार रुपयांची सूट मिळेल.
अॅपल ग्राहकांसाठी अॅपल स्टोअरमध्ये 5 हजार 900, 2 हजार 900 आणि 2 हजार 800 रुपयांपर्यंतच्या प्रॉडक्ट्सच्या खरेदीवर सूट देत आहे. मात्र, ग्राहकांना डिव्हाईस एकाच स्टोअरमधून एकाच दिवशी खरेदी करावे लागतील. ही ऑफर 31 डिसेंबर 2016 पर्यंत असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement