एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जिओ इफेक्ट, एअरटेलचा नफा 76 टक्क्यांनी घटला
2018 च्या आर्थिक वर्षात कंपनीला केवळ 343 कोटी रुपयांचा नफा झाला. गेल्या वर्षी यावेळेला कंपनीला 1461 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
नवी दिल्ली : जिओने इतर दूरसंचार कंपन्यांची अडचण केली आहे. देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलचा नफा 76 टक्क्यांनी घटला आहे. 2018 च्या आर्थिक वर्षात कंपनीला केवळ 343 कोटी रुपयांचा नफा झाला. गेल्या वर्षी यावेळेला कंपनीला 1461 कोटी रुपयांचा नफा झाला होता.
दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा आणि जिओच्या ऑफर्समुळे एअरटेलला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या तिमाहीत एअरटेलची एकूण कमाई 11.7 टक्क्यांनी घटून 21 हजार 777 रुपयांवर आली आहे, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत 24 हजार 651.50 कोटी रुपये होती.
कमाईत दोन अंकी घट झाल्यामुळे व्यवसाय आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. इंटरकनेक्ट युझेज चार्जेस म्हणजेच आययूसीच्या दरात कपात केल्यामुळे एअरटेलला आणखी झळ बसणार आहे, अशी माहिती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (भारत आणि दक्षिण आशिया) गोपाल विठ्ठल यांनी दिली.
यामुळे आता एकीकरण वाढणार आहे. अनेक ऑपरेटर बाजारातून बाहेर फेकले जातील. यापूर्वीही असं झालेलं आहे. एअरटेल बाजारातील महसूल वाढवण्यासाठी सक्षम आहे. ग्राहकांना आणखी चांगल्या सुविधा देऊन रणनिती आखून गुंतवणूक करु, असंही गोपाल विठ्ठल यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement