एक्स्प्लोर
Asusचा झेनफोन 3s मॅक्स लाँच, जबरदस्त कॅमेरा आणि बॅटरी बॅकअप
मुंबई: तैवानी स्मार्टफोन कंपनी आसूसनं मंगळवारी आपला नवा स्मार्टफोन झेनफोन 3s मॅक्स लाँच केला आहे. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे याचा दमदार बॅटरी बॅकअप. याची बॅटरी क्षमता तब्बल 5,000 mAh इतकी आहे. या फोनची किंमत 14,999 रु. आहे. याची विक्री ऑनलाइन स्टोअर आणि ऑफलाइन स्टोअरवर केली जाणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये 5.2 इंच एचडी डिस्प्ले असणार आहे. तसेच मेटल बॉडीसोबत डिस्प्ले 2.5D ग्लास असणार आहे. यामध्ये 1.5GHz ऑक्टाकोअर मीडियाटेक प्रोसेसर आहे. तसेच यामध्ये 3 जीबी रॅमही देण्यात आला आहे.
64 जीबी मेमरी असणाऱ्या या स्मार्टफोनची मेमरी 2 टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनची आणखी एक खासियत म्हणजे याचा कॅमेरा. याचा रिअर कॅमेरा 13 मेगापिक्सल असून याचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सल आहे.
या स्मार्टफोनमध्ये इतरही बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला असून त्यात अॅँड्रॉईड 7.0 मार्शमेलो ऑपरेटिंग सिस्टमही देण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
गुगल पिक्सेलवर तब्बल 29 हजार रुपयांची सूट
बंगळुरूमध्ये बनलेला आयफोन जून महिन्यात मार्केटमध्ये!
शाओमीचा रेडमी प्रो 2 स्मार्टफोनचे फोटो आणि फीचर्स लीक
गुगल पिक्सल स्मार्टफोनवर तब्बल 10,000 रु. सूट!
क्रेडिट कार्ड वापरताना 'या' चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवा!
.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement