(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Apple macOS Ventura : आता मॅकमध्ये नवी OS सिस्टम, मॅक ओएस वेन्चुरामध्ये काय नवीन?
अॅपलने त्यांच्या वार्षिक वर्ल्डवाइड डेवलपर्स कॉन्फ्रेंस (WWDC) इव्हेंटमध्ये मॅकमध्ये वापरण्यात येणाऱ्या ओएस सिस्टमचंही नवीन अपडेट मॅक ओएस वेन्चुराच्या रुपात समोर आणलं आहे.
Apple WWDC 2022 : सर्वात मोठी मोबाईल कंपनी Apple चा सर्वात मोठा इव्हेंट WWDC 2022 नुकताच पार पडला. यावेळी नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व्यतिरिक्त कंपनीने नवीन मॅकबुक एअर देखील लॉन्च केले. तर मॅकसाठी नवा ओएस मॅक ओएस वेन्चुराच्या (Apple macOS Ventura) रुपात सर्वांसमोर आणलं आहे. या ओएसमुळे आता युजर्सना मॅक वापरताना अधिक नवीन गोष्टी करता येणार असून युजर्सना वापर अधिक सोयीस्कर होणार आहे.
या मॅकओएस वेन्चुरा ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्टेज मॅनेजर (Stage Mannager) सारखे काही नवीन फिचर्स असणार आहेत. सोबतच अपडेटेड मेल अॅप देखील वापरकर्त्यांना वापरता येणार आहे. यामुळे यूजर्सना ईमेलला undo करण्याची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे.
अॅपल वॉचमध्येही नवीन अपडेट
अॅपलनं अॅपल वॉच युजर्ससाठी देखील नवं अपडेट समोर आणलं आहे. आता अॅपल वॉचमध्ये ओएस 9 (OS9) वापरण्यात येणार असून यामुळे वॉचचा वापरात कमालीचा बदल होणार असून वापरकर्त्यांना अधिक सोयीस्कर होणार आहे. अॅपल वॉचच्या नव्या OS9 नुसार आता वॉचमध्ये सिरीचं नवीन इंटरफेअरन्स पाहता येणार आहे. याशिवाय आधीपेक्षा अधिक वर्कआऊट मोड्स आता अॅपल वॉचमध्ये पाहायला मिळणार आहे. तसंच विशेष मेडिकेशन अॅपदेखील आता वॉचमध्ये असणार असून याशिवाय वॉचमध्ये अधिक फेसेस वापरकर्त्यांना पाहायला मिळणार आहेत.
नवकोरं मॅकबुकही लॉन्च
यासोबतच या इव्हेंटमध्ये Apple ने आपला नवीन MacBook देखील लॉन्च केला आहे. ज्यामध्ये कंपनीकडून ग्राहकांसाठी अनेक फिचर्सची मेजवाणी देण्यात आली आहे. नव्या MacBook मध्ये कंपनीकडून M2 प्रोसेसर देण्यात आला आहे. Apple नं दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा 5nm डिझाइन केलेला M2 प्रोसेसर 25 अब्ज ट्रान्झिस्टरसह Apple च्या सिलिकॉनची नेक्सट जेनरेशन आहे. असं सांगितलं जात आहे की, M2 प्रोसेसर 10-कोर GPU आहे आणि तो 8-कोर CPU वर काम करतो. हा प्रोसेसर 24GB ची युनिफाइड (Unified) मेमरी हाताळू शकतो. Apple च्या माहितीनुसार, नवीन MacBook Air आणि 13-inch MacBook Pro पुढील महिन्यात निवडक Apple अधिकृत किरकोळ विक्रेत्यांकडे उपलब्ध होईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Apple WWDC 2022 : दमदार फिचर्सची पर्वणी; अॅपलकडून M2 प्रोसेसरसह नवा MacBook Air लॉन्च
- Apple WWDC 2022 : iPhone युजर्ससाठी Apple कडून खास गिफ्ट; iOS 16 लॉन्च, नवे फिचर्स काय?
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.