(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Apple Watch : चक्क घड्याळाने वाचवला 78 वर्षाच्या वृद्धाचा जीव! अॅपलच्या Fall Detection Feature ची कमाल
Apple Watch : अॅपल वॉचमधील Fall Detection Feature ने एक आपत्कालीन मेसेज करुन माईक येगर या 78 वर्षाच्या वृद्धाचा जीव वाचवला आहे.
Apple Watch : स्मार्ट वॉच हे अनेकांना अनेक दृष्टीने महत्वाचे वाटते. त्यातही ते जर Apple Watch असेल तर त्याची गोष्टच काही निराळी असते. ते तुमची कॅलरी किती खर्च झाली, हृदयाचे ठोके, रक्तदाब किती आहे यापासून ते तुमच्या मोबाईपर्यंत सर्वच प्रकारची कामं करते. पण यापुढेही जाऊन Apple Watch च्या फिचरमुळे एका 78 वर्षीय वृद्धाचा जीव वाचलाय हे सांगितलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही. अमेरिकेतल्या 78 वर्षीय माईक येगर यांचा जीव अॅपलच्या Fall Detection Feature मुळे वाचला आहे.
माईक येगर या नॉर्थ कॅरोलिना या ठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीचा जीव अॅपलमुळे वाचला आहे. माईक येगर हे नेहमीप्रमाणे रस्त्यावरुन चालत असताना अचानक त्यांना फिट आली आणि ते खाली पडले. या घटनेची अॅपलच्या फॉल डिटेक्शनमध्ये नोंद झाली. अॅपलने त्यांना एक इमर्जन्सी मेसेज पाठवला, पण माईक यांच्याकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अॅपलने तातडीने ऑटोमॅटिकली 911 या आपत्कालीन नंबरवर एक मेसेज केला आणि माईक यांच्या शारीरिक स्थितीविषयी माहिती दिली. या इमर्जंन्सी मेसेजमुळे संबंधित अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी माईक येगर यांचा जीव वाचवला.
Summerfield Local Department च्या अधिकाऱ्यांनी वेळेवर येऊन संकटात असलेल्या माईक येगर यांचा जीव वाचवला. पण ते अधिकारी आपल्या घरी आलेच कसे असा प्रश्न माईक येगर यांना पडला होता. तुम्ही इथं कसे काय आला? असा प्रश्नही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितलं की माईक यांच्या अॅपल वॉचने त्यांच्या विभागाला एक आपत्कालीन मेसेज करुन याची माहिती दिली होती.
अॅपल वॉचमध्ये एक इमर्जंन्सी सर्व्हिस नावाची सुविधा असते. जर आपल्याला काही आपत्कालीन अडचण किंवा तशा प्रकारच्या शारीरिक स्थितीला सामोरं जावं लागलं तर त्याचा अंदाज घेऊन अॅपलची ही सर्व्हिस अॅटोमॅटिकली मेसेज करते. या आधीही अॅपच्या अनेक फिचर्समुळे लोकांचा जीव वाचल्याच्या घटना घडल्या आहेत.
ऑटोमॅटिकली फॉल डिटेक्शन नावाची सेवा Apple Watch Series 4 मध्ये आणि त्याच्या पुढील मॉडेलमध्ये उपलब्ध असून याचा फायदा 65 वर्षांवरील लोकांना होतो.
महत्वाच्या बातम्या :
Ashadi Wari 2021 : पायी वारीसाठी ठाम असणारे बंडातात्या कराडकर पोलिसांच्या ताब्यात
OBC Reservation : ओबीसी आरक्षण पुन्हा मिळेल : विजय वडेट्टीवार
Maratha Reservation : ...तर मला मुख्यमंत्री करा : खासदार संभाजीराजे छत्रपती