Apple Emojis : अॅपलचं नवीन अपडेट, आता आयफोनमध्ये दिसणार ‘प्रेग्नंट पुरुषा’सह 37 नव्या इमोजी!
Apple New Emojis Update : Apple ने गुरुवारी iOS 15.4 बीटाचा भाग म्हणून इमोजी जारी केल्या आहेत. हे एक विनामूल्य सिस्टम अपग्रेड आहे, ज्याचा आयफोन ग्राहक लाभ घेऊ शकतात. मात्र, या नव्या इमोजींवर वेगवेगळ्या स्तरांतून प्रतिक्रिया येणे सुरु झाले आहे.
Apple New Emojis : आजच्या तांत्रिकदृष्ट्या प्रगत जगात इमोजी हा भावना व्यक्त करण्याचा एक नवीन मार्ग बनला आहे. नवीन iOS 15.4 व्हर्जनसाठी इमोटिकॉन्सची एक नवीन बॅच तयार करण्यात आली आहे. या नव्या इमोजींमध्ये ‘प्रेग्नंट पुरुषा’चा इमोजी देखील आहे. डिजिटल संभाषण अधिक सर्वसमावेशक बनवण्यासाठी इमोजी कंपनीच्या सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. यात नॉनबायनरी इमोटिकॉन्स आणि इतर स्मायलींचा देखील समावेश आहे.
Apple ने गुरुवारी iOS 15.4 बीटाचा भाग म्हणून इमोजी जारी केल्या आहेत. हे एक विनामूल्य सिस्टम अपग्रेड आहे, ज्याचा आयफोन ग्राहक लाभ घेऊ शकतात. मात्र, या नव्या इमोजींवर वेगवेगळ्या स्तरांतून प्रतिक्रिया येणे सुरु झाले आहे.
नव्या इमोजींवर टीका
इतकंच नाही तर सोशल मीडियावरही या प्रकरणाचं पडसाद उमटले आहेत. त्यावर अनेकांनी कमेंट्स टाकून आणि मीम्स शेअर करून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कार्टून साईन डेव्हलपर्स खूप पुढे जात असल्याचा टीका करत, ट्विटरवर अनेकांनी नवीन अपडेटेड इमोजीसची निंदा देखील केली आहे.
नवीन गर्भवती इमोजीसाठी पाच वेगवेगळ्या स्किन टोन असतील. इमोजी दिसण्यासाठी पाठवताना भिन्न त्वचा टोन निवडण्याचे पर्याय दिसेपर्यंत वापरकर्ते इमोजी दाबून धरून ठेवू शकतात. एका ब्लॉग पोस्टमध्ये, कंपनीने म्हटले आहे की, ‘नवीन इमोजी ट्रान्स पुरुष, नॉन-बायनरी लोक किंवा लहान केस असलेल्या महिलांच्या प्रतिनिधित्वासाठी वापरली जाऊ शकते. अर्थातच, या इमोजींचा वापर या गटांपुरता मर्यादित नाही.’
मीडिया रिपोर्टनुसार, युनिकोड कन्सोर्टियमचे सदस्य असणाऱ्या इमोजीपीडियाचे म्हणणे आहे की, ‘काही ट्रान्सजेंडर पुरुष आणि नॉन-बायनरी लोकांमध्येही गर्भधारणा शक्य आहे. हे 1994 मध्ये आलेल्या 'ज्युनियर' चित्रपटासारखे आहे, जो गर्भवती पुरुषावर आधारित आहे.
संबंधित बातम्या
- iPhone : मास्क घातल्यानंतही फेस आयडी वापरून आयफोन करा अनलॉक; काय आहे अॅपलचं नवं फिचर
- WhatsApp New Feature : आता वाढणार ग्रुप अॅडमिनची ताकद, तुम्हाला पाहिजे तेव्हा ग्रुपमधून कोणताही मेसेज डिलीट करू शकता
- What is Metaverse: ‘मेटाव्हर्स’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? आपल्या आयुष्यावर याचा कसा परिणाम होऊ शकतो
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha