एक्स्प्लोर
Advertisement
कॅम्पस प्लेसमेंटसाठी अॅपल पहिल्यांदाच भारतात येणार!
भारतातली ही पहिलीच संस्था आहे, ज्यामधून विद्यार्थ्यांना अॅपल नोकरीची संधी देणार आहे.
नवी दिल्ली : जगातली सर्वात मोठी कंपनी आणि टेक जगतातलं मोठं नाव अॅपल पहिल्यांदाच भारतात कॅम्पस प्लेसमेंटसाठी येणार आहे. अॅपल आयआयटी हैदराबादमध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी येईल. भारतातली ही पहिलीच संस्था आहे, ज्यामधून विद्यार्थ्यांना अॅपल नोकरीची संधी देणार आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबत वृत्त दिलं आहे. आयआयटी हैदराबादचे प्लेसमेंट प्रमुख देवीप्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे. अॅपल येणार असल्यामुळे आनंद आहे. अॅपलला कशा प्रकारचे विद्यार्थ्यांचा शोध आहे, हे सांगता येणार नाही. मात्र संस्थेतील विद्यार्थ्यांना ही आपली बौद्धिक क्षमता दाखवण्याची सर्वात चांगली संधी आहे, असं देवीप्रसाद यांनी सांगितलं.
याशिवाय गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि फिलिप्स यांसारख्या कंपन्यांनीही कॅम्पस प्लेसमेंटसाठी अर्ज केला आहे. बंगळुरु आणि हैदराबाद येथील कॅम्पसमधून या प्लेसमेंट होतील. यासाठी विविध शाखेच्या 350 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यावर्षी कंपन्यांची नजर आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आणि ऑटोमेशन क्षेत्रावर असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
क्रिकेट
राजकारण
Advertisement