(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Google teases Pixel 7 : गुगलने Pixel 7 Series ते Pixel Earbuds Pro पर्यंत हे फीचर्स लॉन्च केले
Google teases Pixel 7 : गुगलच्या I/O इव्हेंटमध्ये अनेक Google ने अनेक पिक्सेल मॉडेलची घोषणा केली.
Google teases Pixel 7 : गुगलच्या I/O इव्हेंटमध्ये अनेक Google ने अनेक पिक्सेल मॉडेलची घोषणा केली. ज्यात कंपनीचे पहिले पिक्सेल स्मार्टवॉच आणि पिक्सेल अँड्रॉइड टॅब्लेट यांचा समावेश केला आहे. कंपनीने या इव्हेंटमध्ये नुकतेच पिक्सेल 6 च्या स्मार्टफोन लॉन्च केला. आता नुकताच पिक्सेल 7 या स्मार्टफोनचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे.
Pixel 6A Smartphone :
Pixel 6a हा पिक्सेल 6 वॉटर प्रूफ आहे. परंतु तो Google च्या टेन्सर चिपसह काही सभ्य हार्डवेअरसह येतो. यात 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे. याचे मॉडेल साधारण Pixel 6 सारखेच आहे. यात 6 GB RAM सह 128 GB इंटर्नल मेमरी आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे.
GOOGLE PIXEL 7 सीरिज
Google I/O 2022 ने पुढील सीरिज Google Pixel 7 आणि Google Pixel 7 Pro चे टीझरही दाखवले आहेत. हे स्मार्टफोन 2023 मध्ये भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. कंपनीने घोषणा केली की स्मार्टफोन Android 13 आणि नवीन Tensor चिपसेटसह पाठवले जातील. या Pixel 7 Pro मॉडेलला तीन सेन्सर मिळतील, तर रेग्युलर मॉडेलमध्ये दोन कॅमेरा सेन्सर असतील. बंपमध्ये सेन्सर्ससाठी कटआउट्सचा समावेश होतो. रेंडर्स ग्रे आणि ऑलिव्ह ग्रीन हे दोन कलर ऑप्शन तुम्हाला या स्मार्टफोनमध्ये मिळतील. या स्मार्टफोनची किंमत नेमकी किती असेल हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.
GOOGLE PIXEL WATCH
Google ने Google Pixel Watch नावाचे पहिले स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. डिझाईनच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास या स्मार्टवॉचची गोल डाय आहे. मेटॅलिक क्राऊनमध्ये हे वॉच आहे. हा स्मार्टवॉच लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा एक स्मार्टफोन असून तुमच्या हेल्थशी संबंधित अपडेट तुम्हाला मिळू शकतील.
GOOGLE PIXEL BUDS PRO
Google Pixel Buds Pro च्या इतर प्रमुख फीचर्समध्ये 11mm ड्रायव्हर, स्वयंचलित व्हॉल्यूम समायोजन, 5-बँड EQ, अवकाशीय ऑडिओ सपोर्ट आणि IPX4 रेटिंग यांचा समावेश आहे. Google Pixel Buds Pro ला ANC सोबत सात तासांचा म्युझिक प्लेबॅक आणि ANC शिवाय 11 तासांचा म्युझिक प्लेबॅक आहे.
महत्वाच्या बातम्या :