Google Pixel Smartphone : Google च्या I/O इव्हेंटमध्ये लॉन्च झाला Pixel 6A स्मार्टफोन; काय आहेत फीचर्स जाणून घ्या
Google Pixel 6a India Launch : Google ने Google I/O 2022 मध्ये आपला "बजेट" फ्रेंडली Pixel 6a स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
Google Pixel 6a India Launch : Google I/O इव्हेंट सुरू झाला आहे. या इव्हेंटमध्ये कंपनीने आपले नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत. यामध्ये गुगलने प्रथमच स्मार्टवॉच लॉन्च केले आहे. गुगल पिक्सेल वॉच (Google Pixel 6A Watch) हे सुद्धा या इव्हेंटमध्ये पाहायला मिळाले. या पिक्सेल वॉचच्या डिव्हाइसमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर केला आहे आणि Apple Watch मधील डिजिटल क्राउन प्रमाणेच, यात एक टेक्निकल क्राऊन आहे. Google Pixel वॉच नवीन Wear OS वर चालणारा आहे. गुललच्या I/o इव्हेंटमध्ये लॉन्च झालेल्या या नवीन स्मार्टफोन आणि वॉच ची नेमकी कोणती वैशिष्ट्ये आहेत ते जाणून घेऊयात.
Google Pixel 6a
Google ने Google I/O 2022 मध्ये आपला "बजेट" फ्रेंडली Pixel 6a स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Pixel 6a हा पिक्सेल 6 वॉटर प्रूफ आहे. परंतु तो Google च्या टेन्सर चिपसह काही सभ्य हार्डवेअरसह येतो. यात 6.1 इंचाचा डिस्प्ले आहे. याचे मॉडेल साधारण Pixel 6 सारखेच आहे. यात 6 GB RAM सह 128 GB इंटर्नल मेमरी आहे. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे तर समोर 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. Google Pixel 6A व्यतिरिक्त, कंपनीने त्यांचे Pixel 7 सीरीज स्मार्टफोन देखील सादर केले आहेत.
Google Pixel Buds Pro
Pixel Buds Pro सॉफ्ट मॅट फिनिश आणि टू-टोन डिझाइनमध्ये येतात. Pixel Buds Pro कोरल, लेमनग्रास, फॉग आणि चारकोल या चार कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. Pixel Buds Pro 21 जुलैपासून प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल. Pixel Buds Pro ची किंमत $199 आहे मात्र, हे इयरबड्स भारतात लॉन्च केले जातील की नाही हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.
Google IO : Google I/O इव्हेंटमध्ये आणखीही अनेक अॅप्सवर नवीन फीचर्स पाहायला मिळाले. यामध्ये गुगल स्मार्टवॉच, यू ट्यूब. गुगल मॅप, गुगल डॉक्स, गुगल ट्रान्सलेट यांचाही समावेश करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Google I/O 2022 : गुगल Maps पासून ते Search पर्यंत, अनेक अॅप्सना मिळाले नवीन फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
- Play Store वर आजपासून सर्व Call Recording अॅप्सवर बंदी, Google चं नवं धोरण लागू
- Delete Gmail Account : तुमचे Gmail अकाऊंट कायमस्वरूपी डिलीट करायचे आहे? 'ही' घ्या सोपी पद्धत