एक्स्प्लोर
नोकिया 6 स्मार्टफोनवर तब्बल 2500 रुपयांची सूट
नोकिया 6 वर 2500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 14,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 12,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

मुंबई : ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉननं 13 ते 17 नोव्हेंबरपर्यंत नोकिया प्रमोशनल सेल इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या सेलमध्ये नोकिया 6 आणि नोकिया 8 या दोन स्मार्टफोनवर सूट देण्यात आली आहे. नोकिया 6 वर 2500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 14,999 रुपये किंमतीचा हा स्मार्टफोन 12,499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. ही ऑफर मिळवण्यासाठी अमेझॉननं एक अट ठेवली आहे. जे ग्राहक अमेझॉनचे प्राइम मेंबर असतील त्यांनाच ही ऑफर लागू होणार आहे. ही ऑफर तुम्हाला कॅशबॅकमधून मिळणार आहे. मोबाइल खरेदी केल्यानंतर 21 दिवसांच्या आत 'अमेझॉन पे'वर ही कॅशबॅश मिळणार आहे. पण तुम्ही जर अमेझॉन प्राइम मेंबर नसाल तर तुम्हाला 1500 रुपयांची सूट मिळेल. यासाठी देखील तुम्हाला अमेझॉन पे वरुन पेमेंट करावं लागेल. नोकिया 6 स्मार्टफोनचे फीचर : - या स्मार्टफोनचा डिस्प्ले 5.5 इंच एचडी आहे. - तसेच यामध्ये स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर आहे. - या स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. - नोकिया 6 मध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून 128 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. - नोकिया 6 हा स्मार्टफोन 64 जीबी व्हेरिएंटसह देखील लाँच करण्यात आला आहे.
आणखी वाचा























