एक्स्प्लोर
एअरटेलची ग्राहकांना अनोखी भेट, नवे प्लॅन लॉन्च
![एअरटेलची ग्राहकांना अनोखी भेट, नवे प्लॅन लॉन्च Airtel Gifted New Offers To Users एअरटेलची ग्राहकांना अनोखी भेट, नवे प्लॅन लॉन्च](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/19154659/airtell-580x395-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांना खूशखबर दिली आहे. एअरटेलने 'माय इन्फिनिटी सीरीज' अंतर्गत नवीन पोस्टपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. ज्या ग्राहकांचा कॉलिंग आणि इंटरनेटवर जास्त खर्च होतो अशा ग्राहकांना नजरेसमोर ठेऊन कंपनीने हे प्लॅन बाजारात आणले आहेत.
एअरटेलने आपले अमर्यादित कॉलिंगचे प्लॅन स्वस्त केले असून या पोस्टपेड प्लॅनची सुरूवात 1,119 रुपयांपासून असेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्यादित कॉलिंगसोबतच एसएमएस आणि इंटरनेटवरही ऑफर मिळणार आहे. 1119 रूपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसोबत प्रत्येक दिवशी 100 एसएमएस आणि 1जीबी 4जी डेटा मिळणार आहे.
या प्लॅनसोबत एअरटेलच्या नव्या विंक म्युजिक आणि विंक मूव्हीजचं मोफत सबस्क्रिप्शन मिळणार आहे. पण यासाठी लागणारा डेटा सशुल्क असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)