एक्स्प्लोर

सरकारच्या बंदीनंतर गूगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरुन TikTok अॅप हटवलं!

भारत सरकारने टिकटॉक, हेलोसह 59 चिनी मोबाईल अॅपवर बंदी घातली. यानंतर आता गूगल प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवरुनही टिकटॉक अॅप हटवण्यात आलं आहे.

मुंबई : केंद्र सरकारने बंदी घातल्यानंतर गूगल प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरवरुनही टिकटॉक अॅप हटवण्यात आलं आहे. भारत सरकारने सोमवारी (29 जून) संध्याकाळी टिकटॉक, हेलोसह 59 चिनी मोबाईल अॅपवर बंदी घातली. मात्र ज्या युझर्सनी आधीच टिकटॉक अॅप डाऊनलोड केलं आहे, त्यांना अॅपवर व्हिडीओ पोस्ट करता येणार आहे. पण आता कोणताही नवा युझर हे अॅप डाऊनलोड करु शकणार नाही.

देशात टिकटॉकचे 20 कोटींपेक्षा जास्त युझर्स आहेत. गूगल प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोअरमधील टॉप 10 अॅप्सपैकी एक होतं. सरकारने बंदी घातलेल्या इतर अॅप्सपैकी बहुतांश अॅप अजूनही प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवर उपलब्ध आहेत. लवकरच हे अॅप्स देखील प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरुन हटवले जातील. यानंतर कोणत्याही नव्या युझरला हे अॅप डाऊनलोड करता येणार नाही.

भारत सरकारचा चीनला दणका; टिकटॉक, यूसी ब्राऊजरसह 59 अॅप्स बॅन

बंदी घातल्यानंतर टिकटॉकने अधिकृत परिपत्रक जारी करुन म्हटलं आहे की, "आम्ही चिनी किंवा कोणत्याही परदेशी सरकारला युझर्सचा डाटा शेअर केला नाही आणि भविष्यातही करणार नाही." "उत्तर आणि स्पष्टीकरण देण्यासाठी आम्हाला संबंधित सरकारी अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. आम्ही भारतीय कायद्याअंतर्गत सर्व गोपनीय माहिती आणि सुरक्षेसंबंधित नियमांचं पालन करतो. आम्ही आमच्या युझर्सची माहिती कोणत्याही परदेशी देशाच्या सरकारला शेअर करत नाही, यात चिनी सरकारचाही समावेश आहे," असंही टिकटॉकने म्हटलं आहे.

सरकारने सोमवारी चिनी अॅप्सवर बंदी घालत म्हटलं की हे अॅप देशाची सार्वभौमत्व, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. लडाखमध्ये एलएसीवर चिनी सैनिकांसोबत सध्या सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बंदी घालण्यात आली आहे.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने याबाबत अधिकृत पत्रक जारी करुन म्हटलं की, आम्हाला विविध स्रोतांकडून तक्रारी मिळाली आहे, ज्यात अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या अॅपच्या दुरुपयोगाचे अनेक अहवाल आहेत. हे अॅप युझर्सचा डाटा चोरुन त्यांना गुपचूप पद्धतीने भारताबाहेर असलेल्या सर्व्हरकडे पाठवला जातो, असं अहवालात म्हटलं आहे.

या चिनी अॅप्सवर बंदी!

1. TikTok (टिकटॉक)

2. Shareit (शेअर इट)

3. Kwai (केवाई)

4. UC Browser (यूसी ब्राऊजर)

5. Baidu map (बायडू मॅप)

6. Shein (शीन)

7. Clash of Kings (क्लॅश ऑफ किंग्ज)

8. DU battery saver (डीयू बॅटरी सेव्हर)

9. Helo (हेलो)

10. Likee (लाईक)

11. YouCam makeup (यूकॅन मेकअप )

12. Mi Community (एमआय कम्युनिटी)

13. CM Browers (सीएम ब्राऊजर)

14. Virus Cleaner (व्हायरस क्लीनर)

15. APUS Browser (एपीयूएस ब्राऊजर)

16. ROMWE (रोमवी)

17. Club Factory (क्लब फॅक्टरी)

18. Newsdog (न्यूजडॉग)

19. Beutry Plus (ब्यूट्री प्लस)

20. WeChat (व्ही चॅट)

21. UC News (यूसी न्यूज)

22. QQ Mail (क्यू क्यू मेल)

23. Weibo (वीबो)

24. Xender (झेन्डर)

25. QQ Music (क्यू क्यू म्युझिक)

26. QQ Newsfeed (क्यू क्यू न्यूज फीड)

27. Bigo Live (बिगो लाईव्ह)

28. SelfieCity (सेल्फी सिटी)

29. Mail Master (मेल मास्टर)

30. Parallel Space 31. Mi Video Call – Xiaomi (पॅरालल स्पेस 31. एमआय व्हिडीओ कॉल- शाओमी)

32. WeSync (व्ही सिंक)

33. ES File Explorer (ईएस फाईल एक्सप्लोरर)

34. Viva Video – QU Video Inc (विवो व्हिडीओ - क्यूयू व्हिडीओ इंक)

35. Meitu (मीटू)

36. Vigo Video (विगो व्हिडीओ)

37. New Video Status (न्यू व्हिडीओ स्टेटस)

38. DU Recorder (डीयू रेकॉर्डर)

39. Vault- Hide (वॉल्ट हाईड)

40. Cache Cleaner DU App studio (कॅशे क्लीनर डीयू अॅप स्टुडिओ)

41. DU Cleaner (डीयू क्लीनर)

42. DU Browser (डीयू ब्राऊजर)

43. Hago Play With New Friends (हॅगो प्ले विथ न्यू फ्रेंड्स)

44. Cam Scanner (कॅम स्कॅनर)

45. Clean Master – Cheetah Mobile (क्लीन मास्टर- चीता मोबाईल)

46. Wonder Camera (वंडर कॅमेरा)

47. Photo Wonder (फोटो वंडर)

48. QQ Player (क्यू क्यू प्लेयर)

49. We Meet (वी मीट)

50. Sweet Selfie (स्वीट सेल्फी)

51. Baidu Translate (बायडू ट्रान्सलेट)

52. Vmate (व्हीमेट)

53. QQ International (क्यू क्यू इंटरनॅशनल)

54. QQ Security Center (क्यू क्यू सिक्युरिटी सेंटर)

55. QQ Launcher (क्यूक्यू लॉन्चर)

56. U Video (यू व्हिडीओ)

57. V fly Status Video (व्ही फ्लाय स्टेटस व्हिडीओ)

58. Mobile Legends (मोबाईल लिजेंण्ड्स)

59. DU Privacy (डीयू प्रायव्हसी)

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद

व्हिडीओ

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Sugar Factory Election Result : 'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
'सोमेश्वर'वर राष्ट्रवादीचे एकछत्री वर्चस्व! सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा 21-0 ने विजय; विरोधकांचे मनसुबे धुळीस
Tribal Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार ॲक्शन मोडवर, 'सेंट्रल किचन'च्या अन्नाच्या दर्जाची होणार चौकशी
Ahilyadevi Holkar Karjmukti Yojana 3rd List : शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
शेतकरी कर्जमुक्तीची तिसरी यादी जाहीर, साडेतीन लाख शेतकऱ्यांना थेट लाभ; लाभार्थ्यांची नावं कुठे पाहाल?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत एकतर्फी विजय; सुनेत्रा पवार भावुक, जय स्मृतीस्थळावर, पार्थ पवारांनाही आनंद
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
धक्कादायक! चिमुकल्या बाळाचे अपहरण करुन विक्री; महिलांची टोळी अटकेत, गुजरातला नेणार असल्याचं तपासातून समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
Embed widget