एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: तरुणानं केलं चक्क स्मार्टफोनशी लग्न!
लास वेगास: अमेरिकेतील लास वेगासमध्ये एका व्यक्तीनं चक्क स्मार्टफोनशी लग्न केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही माहिती देण्यात आली आहे.
जसा लग्नसोहळा असतो तसाच हा लग्न सोहळा देखील पार पडला. फक्त एकाच गोष्टीमध्ये फरक होता. नवरा मुलगा एरॉन चेर्वेनाकनं लग्नासाठी खास ड्रेस परिधान केला होता. पण त्याची 'नवरी' एका डब्यात बंद होती. लास वेगास रिव्ह्यू जनर्लमध्ये ही बातमी प्रकाशित करण्यात आली आहे.
लिटील वेगास चॅपलच्या पादरीनं लग्नाच्या विधी पार पाडताना चेर्वेनाकला विचारलं की, 'एरॉन तू या स्मार्टफोनला कायद्यानं पत्नी मानतोस? तू तिच्यावर प्रेम करतोस? तिचा सन्मान करतोस?' त्यावर त्यानं उत्तर दिलं की, 'होय मी असं करतो.'
द लिटिल लास वेगास चॅपलचा मालक मायकल केलीच्या हवाल्यानं केटीएनव्ही डॉट कॉमचं म्हणणं आहे की, केलीच्या मते, 'सगळ्यात आधी मला वाटलं की हे काय आहे? त्यानंतर म्हटलं की, ठीक आहे... करतात असं.'
केलीच्या मते, 'चेर्वेनाकने आपल्या स्मार्टफोनशी प्रातिनिधिक स्वरुपात लग्न करुन समाजात एक वेगळा संदेश दिला आहे. लोक आज समाजात आपल्या फोनशी एवढं जोडले गेले आहेत की, त्यांना कायम त्याच्यासोबत राहायचं असतं.'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement