एक्स्प्लोर
फेसबुकवरील 68 लाख युजर्सचे फोटो लीक
फेसबुकवरील 68 लाख युजर्सचे वैयक्तिक फोटो लीक झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा फेसबुकने युजर्सची माफी मागितली आहे.
न्यूयॉर्क : गेल्या काही दिवसांपासून सतत फेसबुकवरील डेटा लीक होत आहे. त्याबद्दल आतापर्यंत दोन वेळा फेसबुकने युजर्सची माफीदेखील मागितली आहे. आता पुन्हा एकदा फेसबुकवरील 68 लाख युजर्सचे वैयक्तिक फोटो लीक झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा फेसबुकने युजर्सची माफी मागितली आहे.
फेसबुकवरील एका 'बग'मुळे तब्बल 68 लाख लोकांचे गोपनीय आणि वैयक्तिक फोटो लीक झाले आहेत. आपण अनेकदा एखाद्या अॅप किंवा साईटवर फेसबुक आयडीवरुन लॉग इन करतो, तेव्हा ते अॅप आपल्याकडे फेसबुकवरील फोटोंना अॅक्सेस देण्याची परवानगी मागते. तेव्हा आपण अलाऊ करतो (परवानगी देतो), तेव्हा आपण प्रायव्हेट केलेले फोटो त्या अॅपसोबत शेअर होत नाहीत.
13 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरदरम्यान फेसबुकच्या डेटाबेसमध्ये एक बग आला. त्यामुळे फेसबुक युजर्सचे सर्व फोटो विविध अॅपसोबत शेअर झाले. जे फोटो प्रायव्हेट केले होते, तेदेखील फोटो शेअर झाले. त्यामुळे फेसबुकवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यानंतर आता कोणाचेही वैयक्तिक फोटो कोणत्याही अॅपवर सार्वजनिक झाले तर त्या युजरला लगेच त्याचे नोटिफीकेशन त्याच्या फेसबुकवर मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement