एक्स्प्लोर

मोठी बातमी : सोलापूरचे डॉ. शिरीष वळसंगकर प्रकरणात 59 दिवसांनी आरोपपत्र, मनीषा मुसळेंविरोधात पोलिसांचे खळबळजनक दावे

shirish valsangkar: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी आरोपी मनीषा मुसळे हिच्या विरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आत्महत्येच्या 59 दिवसानंतर पोलिसांनी आरोपी मनीषा मुसळे विरोधात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केलंय.

सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या (shirish valsangkar death case) प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे हिच्या विरोधात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. आत्महत्येच्या 59 दिवसानंतर पोलिसांनी आरोपी मनीषा मुसळे विरोधात 720 पानांचे दोषारोपपत्र दाखल केलं आहे. दोषारोप पत्रात अटकेतील आरोपी मनीषा मुसळे ह्याच डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. दोषारोप पत्रामध्ये पोलिसांनी म्हटले आहे की, ‘मनीषा हिची रुग्णालयातील अरेरावी व पैशांचा गैरव्यवहार समजल्यावर डॉ. शिरीष यांनी डिसेंबर 2024 पासून तिचे अधिकार कमी केले होते.’(shirish valsangkar death case) 

बदनामी आणि प्रतिमा मलिन करण्याची धमकी

'त्यामुळे चिडलेल्या मनीषाने डॉ. शिरीष यांना भेटून आणि फोनवरून सतत बदनामी आणि प्रतिमा मलिन करण्याची धमकी दिली. ई-मेल पाठवून मुलांना मारून स्वतः रुग्णालयासमोर जाळून घेऊन आत्महत्या करण्याचीही धमकी दिली होती, ह्याच खोट्या आरोप आणि धमक्यामुळे व्यथित होऊन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चिट्ठी लिहीत स्वतःच्या परवानाधारक पिस्टलमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली'. डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याने संशयित आरोपी मनीषा मुसळे ह्या भारतीय न्याय संहिता कलम 108 प्रमाने गुन्हा केला आहे, असा आरोप पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोप पत्रामध्ये केला आहे. दरम्यान आरोपी मनीषा मुसळे अद्याप न्यायालयीन कोठडीत असून आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र, दोषारोप पत्राचा अभ्यास करून सुनावणी वेळी बाजू मांडली जाईल, अशी माहिती आरोपीचे वकील ऍड. प्रशांत नवगिरे यांनी दिली आहे.

कोण होते डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर? 

डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून MBBS, MD चे शिक्षण घेतले. लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे. देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्ण सेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते. 

मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले आहेत. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काहीकाळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते. देशातील विविध भागात ते याचं विमानाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे. 

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम 

 शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला.  त्यानंतर दुसरी राउंड फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले.  रात्री 9 वा. त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले.  मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यासह 5 तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रात्री 10:20 मिनिटांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले. रात्री 10:30 वा. पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील केले. रात्री 10 : 45 वा. फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक काडतूस, रक्ताचे नमुने घेतले.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांनी मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांनी मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप

व्हिडीओ

Sharmila Thackeray Makarsankrant : शर्मिला ठाकरे यांच्याकडून कार्यकर्त्यांना तिळगुळाचे वाटप
Avinash Jadhav : बिनविरोध निवडणूक बाबतची अविनाश जाधव यांची याचिका कोर्टाने फेटाळली
Sharad Pawar Ajit Pawar NCP : एकत्र येणार? नाही..नाही..नाही, अजित पवारांचं उत्तर ऐकलं का? Special Report
BMC Election 2026 Ravikiran Deshmukh :ठाकरे vs फडणवीस?मुंबईत कुणाचं पारडं जड?पालिकेचं सोपं विश्लेषण
Sanjay Raut Mumbai : Eknath Shinde यांच्याकडे हरामाचा पैसा कुठला? गणेश नाईक यांनी उघड करावं- राऊत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांनी मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांनी मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
मकरसंक्रातीच्या सणादिवशी सोने, चांदीचा भाव भिडले गगनाला, १० ग्रॅम सोने खरेदी करण्यासाठी लागणार इतकी रक्कम, जाणून घ्या आजचे दर
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
निवडणूक आयोगानं सत्ताधाऱ्यांना वेगळा तिळगूळ दिला, आधीचा प्रचारबंदीचा नियम मोडून घरोघरी पैसा वाटपासाठी सत्ताधाऱ्यांना आजचा दिवस दान दिला; संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget