एक्स्प्लोर

Dr Shirish Valsangkar Death Case: दहा दिवसानंतरही गूढ कायम, फक्त चर्चाच सुरू, डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यूप्रकरणात आतापर्यंत नेमकं काय-काय घडलं?

Dr Shirish Valsangkar Death Case: सोलापुरातील प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात दहा दिवसानंतरही गूढ कायम आहे.

सोलापूर: सोलापुरातील प्रख्यात मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात दहा दिवसानंतरही गूढ कायम आहे.या प्रकरणातील आरोपी मनीषा मानेच्या जामीनासाठी सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे. या प्रकरणात अनेक चर्चा तर्क वितर्क लावले जात आहेत. डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले तरी त्यांच्याबद्दलचे गूढ अद्यापही कायम आहे. याबाबत बोलल्या जाणाऱ्या गोष्टींपैकी काय खरं आणि काय खोटं, याबद्दल संभ्रमावस्था आहे. तपास यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, नक्की काय घडलं हे कधी समोर येणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. डॉक्टरांचा वारंवार अपमान व्हायचा. त्यांनी उभारलेल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ओपीडीचेच अधिकार होते, ओळखीच्या रुग्णाचे बिल कमी करण्यासाठी सांगितल्यानंतर देखील ते कमी केले जात नव्हते. त्यांच्याच रुग्णालयातील त्यांचे अधिकार कमी केल्याच्या, त्यांच्या शब्दाला किंमत नसल्याच्या, गोष्टी चर्चेत आहेत.

डॉ. शिरीष वळसंगकर त्यांचे पुत्र आणि सून हे तिघेही न्यूरोसर्जन होते. प्रत्येकजण आपापल्या रुग्णांची बिले स्वतः घेत होते. या प्रकरणात अटकेनंतर कारागृहात असलेल्या मनीषाला वेल्फेअरसंदर्भातील निर्णय होते. काही आवश्यक वस्तू लागल्या तर त्या डॉ. शिरीष सरांच्या स्वाक्षरीने मागवल्या जायच्या, अशीही चर्चा आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील अधिकार सुनेला दिलेले असतानाही त्यांना डॉक्टरांचा हस्तक्षेप मान्य नसल्याच्या आणि सून व मुलाच्या अंतर्गत कलहाचा हॉस्पिलटवर परिणाम होऊ नये म्हणून डॉ. शिरीष वळसंगकरांचे येणं-जाणं वाढलं होतं. हे मुलगा आणि सुनेला मान्य नव्हते यामुळे काही वाद होत होते, अशीही चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र या सर्व गोष्टींना अधिकृत दुजोरा नाही. या फक्त चर्चाच आहेत. याचं उत्तर अधिकृतपणे पोलिसांच्या तपासानंतर बाहेर येणार आहे.

मनीषा मुसळे-मानेला अटक आणि चौकशी

डॉ. वळसंगकर यांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकर यांनी एक चिठ्ठी लिहलेली होती, यामध्ये मनीषा मुसळे-मानेच्या नावाचा उल्लेख असल्याची माहिती समोर आल्यानंतर तिला ताब्यात घेऊन तिची चौकशी करण्यात आली, त्यानंतर आता या महिलेला सध्या 9 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. मनीषाला यापूर्वी पाच दिवस पोलिस कोठडी सुनावलेली आहे, त्यामुळे तिच्यापुरता प्राथमिक तपास संपलेला असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर डॉ. वळसंगकर यांच्या मुलाची आणि सुनेची देखील याप्रकरणी चौकशी केली आहे.

कोण होते डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर? 

डॉ. शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील न्युरोफिजिशियन होते. त्यांचे वय 69 वर्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली S P Institute of Neurosciences हे अत्याधुनिक सुविधांसह रुग्णालय त्यांनी उभारलं आहे. डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरमधील दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी डॉ. व्ही.एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून MBBS, MD चे शिक्षण घेतले. 

लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्समधून MRCP (UK) ही पदवीही मिळवली आहे. देशभरातील नामांकित मेंदूविकार तज्ञांमध्ये त्यांचा नावलौकिक होता. 1999 मध्ये हॉस्पिटल रुग्ण सेवेत आले. कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असे त्यांचे एसपीएम न्यूरो हॉस्पिटल आहे. न्यूरोलॉजी संबंधी निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, संशोधनासाठी त्यांचे हॉस्पिटल मानांकित होते. 

मेंदू विकारासंदर्भातील शस्त्रक्रियावरील उपचाराचे शोधनिबंध त्यांनी देश, विदेशातून सादर केले आहेत. कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल, कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे इंटर्नशीप तर डॉ. व्हीएम मेडिकल कॉलेजमधून पदव्यूत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. लंडनमधील मैदा वेल न्यूरोलॉजिकल हॉस्पिटल येथे त्यांनी काहीकाळ प्रशिक्षण घेतले. बॉम्बे हॉस्पिटलमधून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवात केली. वैद्यकीय सेवेशिवाय देखील ते प्रचंड हौशी होते. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे विमान देखील खरेदी केले होते. देशातील विविध भागात ते याचं विमानाने फिरत होते. इतकंच नाही तर अनेक शिकाऊ वैमानिकांना देखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे. 

डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येपूर्वीचा घटनाक्रम 

शुक्रवारी (18 एप्रिल) रात्री 8 वा. एस.पी ऑफ न्युरो सायन्सेस येथे रुग्णांची तपासणी करून घरी परतले. रात्री 8:30 बेडरूमच्या बाथरूममधून बंदुकीच्या गोळीचा आवाज आला.  त्यानंतर दुसरी राउंड फायर झाल्यावर कुटुंबीयांनी बेडरूममध्ये धाव घेतली. यावेळी डॉ. शिरीष वळसंगकर हे रक्ताच्या थारोळ्यात माखलेले दिसले.  रात्री 9 वा. त्यांच्याच रुग्णालयामध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांना दाखल करण्यात आले.  मुलगा डॉ. अश्विन आणि सून डॉ. शोनाली यांच्यासह 5 तज्ञ डॉक्टरांनी जवळपास पाऊण तास त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. रात्री 10:20 मिनिटांनी डॉक्टर शिरीष वळसंगकर यांना मृत घोषित करण्यात आले. रात्री 10:30 वा. पोलीस उपायुक्त विजय कबाडे हे घटनास्थळी दाखल झाले आणि बेडरूम सील केले. रात्री 10 : 45 वा. फॉरेन्सिकची टीम दाखल झाली आणि बेडरूममधील बंदूक काडतूस, रक्ताचे नमुने घेतले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
हिवाळ्याच्या थंडीत आवर्जुन खावा चाकवताची भाजी, पचनसंस्था अन् हाडांना बळकटी; जाणून घ्या गुणकारी फायदे
Smriti Mandhana : स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
स्मृती मानधनाची पलाश मुच्छल सोबतचं लग्न स्थगित झाल्यानंतर पहिली पोस्ट,फॅन्सनी एक गोष्ट हेरली, म्हणाले...
US Visa Social Media Policy : अमेरिकेला जायचंय, तुमच्या सोशल मीडियाची खात्यांची तपासणी होणार,  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाचा नवा निर्णय
अमेरिकेचा व्हिसा हवाय, तुमचा सोशल मीडिया जपून वापरा, ट्रम्प प्रशासन तपासणी करणार
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
जय की बारात... लेकाच्या लग्नात अजित दादांचा झिंगाट डान्स, रोहित अन् युगेंद्र पवारही एकाच फ्रेममध्ये, पाहा फोटो
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
धक्कादायक! बीडमार्गे शिर्डीला निघालेल्या भाविकांना मध्यरात्री लुटले, ट्रकचालकाने व्हिडिओतून सांगितला थरारक प्रसंग
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Embed widget