एक्स्प्लोर

अजित पवारांनी आता आवडीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं, शहाजीबापूंनी केले दादांचे कौतुक

ShahajiBapu Patil On ajit pawar: शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजितदादांचे कौतुक केले आहे.

ShahajiBapu Patil On ajit pawar:  'महाविकास आघाडीच्या काळात अजितदादा (Ajit Pawar) रागातून आणि निराशेतून उपमुख्यमंत्री होते पण आता त्यांनी आवडीने हे पद स्वीकारलं आहे', असं म्हणत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी अजित पवारांचे कौतुक केले आहे. 'त्यांच्या आवडीने ते भाजप आणि शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत', असं देखील त्यांनी म्हटलं आहे. तर पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार हे रागातून आणि निराशेतून उपमुख्यमंत्री झाल्याचा खुलासा देखील शहाजीबापू पाटील यांनी यावेळी  सोलापुरात माध्यमांशी  बोलताना केला आहे. 

अजित पवारांच्या येण्यामुळे सरकार अजून गतीमान झाल्याचा विश्वास देखील शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केला आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'आता तीनही पक्षांच्या  आमदारांना सांभाळायाची  जबाबदारी आता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवारांची आहे.' तसेच आगामी  लोकसभा निवडणुकीत किमान 47 आणि  विधानसभेत 225 जागा जिंकणार असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे. 

'दादांना जर सुप्रियाताईंबद्दल माया जागी झाली तर...'

अजित पवारांना सुप्रियाताईंविषयी माया जागी झाली तर विरोधकांना एक जागा मिळले अन्यथा लोकसभेच्या सर्व जागा महायुती जिंकेल असाही दावा शहाजीबापूंनी केला आहे. तसेच अजित पवारांनी सांगोल्याला निधी देताना कोणताही अन्याय केला नसला तरी गुवाहाटीला इतर आमदारांच्या भावना मी माध्यमांच्या समोर बोलून दाखवल्या होत्या असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. 

'आता होणाऱ्या विस्तारात आमदारांची नाराजी संपेल' 

मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने शिंदे गटातील दोन ते तीन जेष्ठ आमदारांमध्ये नाराजी असल्याचा खुलासा देखील त्यांनी केला आहे. पण आता होणाऱ्या विस्तारात ती नाराजी संपेल अशीही कबुली शहाजीबापू पाटील यांनी दिली आहे. तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचा अलंकार आहेत आणि त्यांच्याचसारखे गावपातळीवर काम करणारे एकनाथ शिंदे आहेत, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. 

राऊंतावरही केला घणाघात 

संजय राऊत हे अपशकुनी असल्याचं म्हणत त्यांना कोणीही आपल्या पक्षात घेणार नाही असा घणाघात शहाजीबापू पाटलांनी संजय राऊतांवर केला आहे. तसेच ते ज्या पक्षात जातील तो पक्ष फुटतो अशी सगळ्यांची खात्री झाल्याचं म्हणत त्यांनी राऊतांना टोला लगावला आहे. महाराष्ट्र पेटवायचे काम करणाऱ्या संजय राऊतांना मतं देऊन निवडून दिलं हे आमचं दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच शिंदे गटाचा कोणताही अपमान दिल्लीत झाला नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. 

हे ही वाचा : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Solapur Shivsena :आढावा बैठकीदरम्यान श्रीकांत शिंदेंसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक, दौरा संपताच अख्खी कार्यकारिणीच बरखास्त; सोलापुरात मोठी उलथापालथ
आढावा बैठकीदरम्यान श्रीकांत शिंदेंसमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक, दौरा संपताच अख्खी कार्यकारिणीच बरखास्त; सोलापुरात मोठी उलथापालथ
Summer Heat wave: राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
राज्यात उष्णतेची लाट, अकोल्यात सर्वाधिक 44 अंश तापमान; राज्य सरकारकडून तीन व्यापक SOP जारी
Solapur Crime News: चार महिन्यापूर्वी झालं लग्न, पैशाच्या हव्यासापायी नराधम पतीने काढला पत्नीचा काटा, नंतर रचली खोटी कहाणी, पण...; घटनेनं सोलापूर हादरलं!
चार महिन्यापूर्वी झालं लग्न, पैशाच्या हव्यासापायी नराधम पतीने काढला पत्नीचा काटा, नंतर रचली खोटी कहाणी, पण...; घटनेनं सोलापूर हादरलं!

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nida Khan Nashik Physical Harassment Case: नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
नाशिकमधील महिला अत्याचार धर्मांतर प्रकरणात मोठा ट्वि्स्ट, निदा खान मुख्य सूत्रधार, हादरवणारी माहिती समोर
Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill: महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
महिला आरक्षण लागू करण्यासाठी आजपासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात; 'नारी शक्ती वंदन अधिनियम' विधेयकाची A टू Z माहिती
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget