(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सन्माजनक वागणूक न मिळाल्यास शेकाप आघाडीतून बाहेर पडणार, डॉ. बाबासाहेब देशमुखांचा इशारा
समाजवादी पक्षानं महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेनंतर आणखी एक घटक पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. मविआत जर सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर बाहेर पडण्याची भूमिका शेतकरी कामगार पक्षाने घेतलीय.
Sangola Vidhansabha election : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वत राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. अशातच महाविकास आघाडीसह (Mahavikas Aaghadi) महायुतीत जागावाटपाचा पेच कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दोन्हीकडून अद्याप उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. अशातच समाजवादी पक्षाच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेनंतर आता आणखी एक घटक पक्ष बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीत जर सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर बाहेर पडण्याची भूमीका शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख ( Dr Babasaheb Deshmukh) यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर बाहेर पडण्याची भूमिका
महाविकास आघाडीत जर सन्माजनक वागणूक मिळत नसेल तर शेतकरी कामगार पक्ष तत्काळ महाविकास आघाडीतून बाहेर पडेल असा इशारा बाबासाहेब देशमुख यांनी दिला आहे. आगामी निवडणुकीत शेकाप सांगोला विधानसभेत उमेदवार देईल आणि निवडणूक लढेल. हीच गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली असणार आहे, असं बाबासाहेब देशमुख म्हणाले. समाजवादी पक्षाच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिके नंतर आता शेकपा देखील बाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीत सन्मानजनक वागणूक मिळत नसेल तर बाहेर पडण्याची भूमिका जाहीर केली आहे. महाविकास आघाडीत सांगोला विधानसभेची जागा शेकापच्या वाट्याला असताना देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी दीपक साळुंखे यांना पक्षात घेतल्याने शेकापची नाराजी आहे. जर महाविकास आघाडीत वेगळा निर्णय घेतला जात असेल तर शेकाप आपला उमेदवार याठिकाणी देणार असल्याचे डॉ बाबासाहेब देशमुख म्हणाले.
दीपक आबा साळुंखे पाटील यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
दरम्यान, नुकताच अजित पवार गटाचे नेते दीपक आबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यांना सांगोला मतदारसंघातून उमेदवारी देण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीत या जागेवरुन बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दीपक आबा साळुंखे पाटील यांना जर महाविकास आघाडीतून तिकीट मिळाले तर शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख हे बंडखोरी करुन निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं सांगोल्याच्या जागेवरुन महाविकास आघाडीच तिढा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या: