संगोल्यात गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून मशाल विजयी होणार; दीपक साळुंखेंचा प्रवेश अन् ठाकरेंकडून उमेदवारीचे संकेत
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील (Deepak Salunkhe) यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
Deepak Salunkhe join Shivsena Thackeray Group : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला तालुक्यात अजित पावरांना (Ajit Pawar) मोठा धक्का बसला आहे. कारण सांगोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे पाटील (Deepak Salunkhe) यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती मशाल घेतली आहे. त्यामुळं आता दीपक साळुखे पाटलांना सांगोला विधानसभेची उमेदवारी मिळणार का? असा सवला उपस्थित केला जातोय. फक्त दीपक आबा यांच्या हाती मशाल दिली आहे. सांगोल्याचा आमदार गद्दार झाला पण तुम्ही माझ्यासोबत आहेत आणि शब्दाला जागाल असं वक्तव्य देखील उद्धव ठाकरेंनी केलंय.
आजपासून संपूर्ण मतदारसंघात मशाल पोहोचवा
दसऱ्यानंतर पहिल्यांदाच मी समोर आलो आहे. मधल्या काळत हॉस्पिटलची वारी केल्याचे उद्धव टाकरे म्हणाले. आराम करायचा किती? हराम्यांना घालवायचं आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. मुहूर्त चांगला लागलाय. मशाल कशी पेटवायची आणि कोणाकोणाला चटके द्यायचे हे तुम्हाला ठरवायचे आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. आजपासून संपूर्ण मतदारसंघात मशाल पोहोचवा असेही ठाकरे म्हणाले.
सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता
सांगोला विधानसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापने सांगोल्याच्या जागेवर दावा केला आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख हे या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळं जर महाविकास आघाडीकडून दीपक साळुंखे पाटील यांनी उमेदवारी मिळाली तर आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. बाबासाहेब देशमुख हे अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
संगोल्याच्या गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून हातात मशाल घेऊन दीपक आबा विजयी होणार : संजय राऊत
संगोल्याच्या गद्दाराच्या छाताडावर पाय रोवून हातात मशाल घेऊन आपले दीपक आबा विजयी होणार असल्याचा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. ज्या एका गद्दाराला महाराष्ट्रातील झाडी डोंगर दिसले नाही आणि दुसऱ्या राज्यातलं झाडे डोंगर दिसले त्या झाडाच्या मुळाखाली त्याला गाडायचे आहे, असंही राऊत म्हणाले. आबा कार्यक्रम फिट करण्यासाठी आले आहेत. आपल्यासारखा माणूस शिवसेनेत आला तुम्ही उद्धवजींचे हात बळकट करण्याचे निर्णय घेतला आहे. खात्री आहे की आबा आणि चाहत्यांना आणि संगोल्याला गर्व वाटेल असे निर्णय उध्दव ठाकरे घेतील असे राऊत म्हणाले. ते आमदार म्हणून विजय होतील आणि नेतृत्व मंडळात त्यांना संधी मिळेल असेही राऊत म्हणाले. त्यामुळं सर्वांनी गद्दारांना गाडण्यासाठी मशाल रोवायला पाहिजे असे राऊत म्हणाले.