एक्स्प्लोर

'धनगर, वंजारी आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव'; गोपीचंद पडळकरांची जरांगेंवर अप्रत्यक्ष टिका

Manoj Jarange : ओबीसी मेळाव्यात बोलतांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करतांना त्यांचा अर्धवटराव असे उल्लेख करत अप्रत्यक्ष टिका केली.  

सोलापूर (पंढरपूर) : शनिवारी झालेल्या पंढरपूरच्या सभेत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्यावर सडकून टीका केली. नाव न घेता जरांगेंना पडळकर हे अर्धवटराव म्हणाले. “झपाटलेला चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांच्या हातात अर्धवटराव नावाचा एक बाहुला असतो. त्याची तार खेचली तसा तो बोलतो. तसेच, आरक्षणाच्या प्रश्नावर बोलणारे अनेक अर्धवटराव तयार झालेत, असे पडळकर म्हणाले. 

मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नयेत या मागणीसाठी सोलापूरच्या पंढरपूरमध्ये शनिवारी ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता, याच मेळाव्यात बोलतांना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका करतांना त्यांचा अर्धवटराव असे उल्लेख करत अप्रत्यक्ष टिका केली.  दरम्यान, पुढे बोलतांना पडळकर म्हणाले की,"धनगर, वंजारी एनटी आहेत. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. भुजबळांच्या नादी लागून हे समाज उगाच आक्रमक होत आहेत. हे दोन्ही समाज स्थानिक स्वराज्य संस्था आणि केंद्रीय नोकरी शिक्षणातलं ओबीसीतून आरक्षण भोगतात, असेही पडळकर म्हणाले. 

गावबंदी संविधानाची पायमल्ली, भीमसैनकांनी सोबत लढावं पडळकरांचे आवाहन

याच सभेत बोलतांना आमदार पडळकरांनी भीमसैनिकांना साद घातली. “एकीकडे आमच्या आरक्षणावर अतिक्रमण करायचं. दुसरीकडे गावबंदी करायची, आमच्यावर बहिष्कार टाकायचे हे प्रकार संविधानाची पायमल्ली करणारे आहेत.” असं पडळकर म्हणाले. बाबासाहेबांनी ओबीसी हा शब्द पहिल्यांदा वापरल्याची आठवण त्यांनी यावेळी करुन दिली. बाबासाहेबांना थेट ओबीसी आरक्षण प्रश्नाशी यशस्वीपणे जोडल्याचं पहायला मिळतंय. कोळी बांधवांना ओबीसी ऐवजी एसटी प्रवर्गात आरक्षण द्या, अशी भूमिका देखील पडळकर यांनी मांडली. 

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका...

या राज्यात सर्वांना एक न्याय मिळत नाही. ओबीसी बांधवांना काही मिळतं नसताना त्याच्या ताटातून हिसकावून घेण्याचा काम सुरु आहे. मुख्यमंत्री कैकयीची भूमिका घेत आम्हाला वनवासात पाठवायचे काम करीत आहे. तुम्ही राजधर्म पाळा असे म्हणत पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेवर तोफ डागली. 

ओबीसी दाखले वाटायची दुकाने सुरु

ओबीसी खिंडीत गाठून संपवायचा डाव सुरू आहे. एका बाजूला तुमच्या आरक्षणाला धक्क लावणार नाही म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूने ओबीसी संपवायचा डाव सुरू आहे. आता ओबीसी दाखले वाटलेत त्याची श्वेतपत्रिका काढा. या महाराष्ट्राच्या सर्व संपत्ती आणि जमिनीचे समान वाटप करा. ओबीसी दाखले वाटायची दुकाने सध्या सुरू झालीत, असेही पडळकर म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

'फुलं उधळायला 200 जेसीबी आणि हेलिकॉप्टर, अशी गरीबी आम्हालाही हवी,' प्रकाश शेंडगेंचा जरांगेना टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding : पेट्रोल भरायला आला आणि  काळाने घाला घातला...घाटकोपर दुर्घटनेत तरुणाचा मृत्यूABP Majha Headlines : 10 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सZero Hour Amit Shah Exclusive : राज्यात पक्षफुटीचा फायदा की तोटा? अमित शाह यांची सडेतोड मुलाखत!ABP Majha Headlines : 09 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 
Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद
EVM-VVPAT : ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या दारात पोहोचले; काय निर्णय होणार?
Embed widget