पती पत्नीच्या वादात बापाने तीन मुलांच्या अंगावर पेट्रोल ओतलं, नाका-तोंडात गेलं; सावंतवाडीतील भयानक प्रकार
Sindhudurg Crime News: सावंतवाडी शहरात तीन मुलांसह स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न एका व्यापाऱ्याने केला.
![पती पत्नीच्या वादात बापाने तीन मुलांच्या अंगावर पेट्रोल ओतलं, नाका-तोंडात गेलं; सावंतवाडीतील भयानक प्रकार Sindhudurg Crime News A businessman tried to pour petrol on himself along with three children in Sawantwadi sindhudurg पती पत्नीच्या वादात बापाने तीन मुलांच्या अंगावर पेट्रोल ओतलं, नाका-तोंडात गेलं; सावंतवाडीतील भयानक प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/22/e7989691fdfa86781c11a864492539201724297709523987_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sindhudurg Crime News सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गमधील सावंतवाडीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावंतवाडीत पती पत्नीच्या वादात पतीने तिन्ही मुलांच्या अंगावर पेट्रोल ओतल्याचा भयानक प्रकार घडला आहे. या घटनेत त्यात एका चार वर्षाच्या मुलाच्या नाका-तोंडात पेट्रोल गेल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याप्रकरणी हुसेन गडीयाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
सावंतवाडी शहरात तीन मुलांसह स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न एका व्यापाऱ्याने केला. त्यातील एका चार वर्षीय मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा प्रकार मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सावंतवाडी बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्समधील कापड दुकानात घडला. या प्रकरणी पोलिसांनी हुसेन गडीयाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
पती व पत्नी यांचे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ठ-
पती-पत्नीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. हुसेन गडीयाली यांचे बाजारपेठेतील वसंत प्लाझा कॉम्प्लेक्स येथे कपड्यांचे दुकान आहे. पती व पत्नी यांचे घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पत्नी आपल्या तिन्ही मुलांना घेऊन दुकानात आली. रात्री हुसेन गडीयाली हे दुकान बंद करीत असताना पत्नी आपण घरी जाणार नाही. मी दुकानातच राहणार आहे, असे ठामपणे सांगत राहिली. या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
तर तुला आणि मुलांना मारून टाकीन...-
'तू दुकानातून घरी जा...तू घरी गेली नाहीस, तर तुला आणि मुलांना मारून टाकीन', तसेच स्वतःला संपवून घेईन, अशी धमकी पतीने दिली. यावेळी हुसेन गडीयाली यांनी रागाच्या भरात पेट्रोल पंपावर जाऊन बाटलीतून आणलेले पेट्रोल आपल्यासह तिन्ही मुलांच्या अंगावर ओतले. त्यात एका चार वर्षाच्या मुलाच्या नाक व तोंडात पेट्रोल गेले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हुसेन याला ताब्यात घेतले. त्यानंतर घाबरलेल्या चार वर्षीय मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरनी तात्काळ प्राथमिक उपचार केले. त्यामुळे त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली. या प्रकरणी पत्नीने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मुलांसह स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती हुसेन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
संबंधित बातमी:
शॉकिंग! बदलापूरच्या नराधमाचे 24 व्या वर्षापर्यंतच झाले 3 लग्न; तिन्ही बायका सोडूनही गेल्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)