![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Konkan News: तळकोकणात कंदांतील सर्वात पौष्टिक कंद कणघरची लागवड, पांढऱ्या रताळ्यांपासून शेतकऱ्यांना मिळतोय लाखोंचा नफा
Kokan News: कणघरच्या शेतीवर वातावरणातील बदलांचा कोणताही परिणाम होत नाही. पाच ते सहा महिन्यांची ही कणघरची शेती किफायतशीर असल्याने वेतोरे गावचे शेतकरी मोठ्या प्रमाणावर ही शेती करतात.
![Konkan News: तळकोकणात कंदांतील सर्वात पौष्टिक कंद कणघरची लागवड, पांढऱ्या रताळ्यांपासून शेतकऱ्यांना मिळतोय लाखोंचा नफा Konkan News Cultivation of sweet Potato the most nutritious tuber in konkan Konkan News: तळकोकणात कंदांतील सर्वात पौष्टिक कंद कणघरची लागवड, पांढऱ्या रताळ्यांपासून शेतकऱ्यांना मिळतोय लाखोंचा नफा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/22/f3bafee727df192d6fa4cf4a052aeda1168742060600789_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सिंधुदुर्ग : कोकणात (Kokan News) पावसाळ्यात प्रामुख्याने भात शेती केली जाते. मात्र या भातशेतीला फाटा देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावातील शेतकरी भात शेती सोबत कणघरची देखील शेती करतात. कणघर हे एक कंदमूळ आहे. एप्रिल, मे, जून अशा तीन महिन्याच्या कालावधीत शेतकरी कणघरची लागवड करतात. जमिनीत कंद पुरून त्या कंदाना कोंब आला की त्या वेलींना आधार म्हणुन खुंट पुरले जातात. या कणघरच्या शेतीवर वातावरणातील बदलांचा कोणताही परिणाम होत नाही. पाच ते सहा महिन्यांची ही कणघरची शेती किफायतशीर असल्याने वेतोरे गावचे शेतकरी मोठ्या प्रमाणावर ही शेती करतात.
वेतोरे गावात 50 हेक्टरवर कणघरची लागवड केली जाते. एकरी चार लाख रुपये खर्च वजा करता निव्वळ नफा मिळतो. वेतोरे गावातील सुशांत नाईक या शेतकऱ्याने एप्रिल महिन्यात कणघरची लागवड केली.त्यांना यापासून सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात उत्पादन मिळणार आहे. लवकर लागवड करून बाजारपेठेत जेवढे लवकर कणघर येईल तेवढा शेतकऱ्यांना नफा मिळतो. एकाच वेळी उत्पन्न बाजारपेठेत आले तर दर कमी मिळतो. परिणामी शेतकऱ्यांना नुकसानाला तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतकरी एप्रिल, मे, जून अशा पद्धतीने कणघरची लागवड करतात.
गोव्यात देखील मोठी मागणी
कणघर शेती ही बाजारपेठेच्या सोईनुसार लागवड करून उत्पादन घेऊ शकता. वेतोरे गावात मोठ्या प्रमाणावर कणघरची शेती केली जाते म्हणून कणघरचं गाव वेतोरे म्हणून ओळख आहे. कणघरला सिंधुदुर्गच्या स्थानिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी असून जवळच्या गोवा राज्यात देखील मोठ्या प्रमाणावर कणघरला मागणी आहे. गोवा राज्यातून व्यापारी वेतोरे गावात येऊन कणघरची खरेदी करतात.
उपवासाच्या दिवशी कणघर उकडून खाल्ले जाते
जमिनीखाली वाढणाऱ्या वनस्पतींना कंदमूळं असं म्हणतात. उपवासाच्या दिवशी किंवा सॅलेडमधून कंदमूळं खाण्याची पद्धत आहे. जमिनीखाली दडलेल्या या कंदमुळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व असतात. ज्यामुळे त्वरीत ऊर्जा मिळू शकते. कणघर बाहेरून लाल आणि आतून पाढऱ्या रंगाची असतात. पचनास हलकं असल्यामुळे तुम्ही कणघर कधीही खाऊ शकता. सामान्यपणे उपवासाच्या दिवशी कणघर उकडून खाल्ले जाते. कणघरमध्ये फासबर्स, व्हिटॅमिन ए, बी 6, सी, डी आणि ई, पोटॅशियम, लोह असतात. जे आरोग्यासाठी चांगले आहेत.
कंदांतील सर्वात पौष्टिक कणघरचा कंद. कोकणात हा पावसाळ्यात अनेक ठिकाणी शेतकरी उत्पादन घेण्यासाठी म्हणून लावतात. कणघरला पांढरी रताळी असेही म्हणतात. हे कंद मातीत झुबक्याने लागतात. ते आकाराने लांबट गोल असून त्यावर थोडेसे उंचवटे असतात. एका कणघरचे वजन अंदाजे 100-150 ग्रॅम असते. हे उकडून किंवा चुलीतील राखेत भाजून खातात. आजारातून उठलेल्या व्यक्तीस ताकद येण्यासाठी हा कंद देण्याची प्रथा कोकणात आहे.
कणघरं बाजारात दिवाळीनंतर येतात. दिवाळी ते संक्रांत याच काळात हे वेल कितीही पाणी घातले तरी सुकतात. जसजसे वेल सुकू लागतात तसतसे पाणी घालणे बंद केले जाते. वेल पूर्ण सुकल्यावर वेल कापून काडून कणघर गोळा करून ठेवले जातात. कंद खोदून काढून त्यातील एखाद दोन पुढील बी म्हणून ठेवली जाते. उरलेले स्वच्छ धुऊन हवेशीर जागी ठेवून बाजारपेठेत विक्रीसाठी नेले जातात. या कंदांना बटाटेसारखे मोड येत राहात नाहीत. त्यांना सुप्तावस्था असते ती किमान चार ते पाच महिने तरी ही सुप्तावस्था टिकते.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)