Fashion: मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला! दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा...
Fashion: अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत गेलेल्या फडणवीसांनी जो ड्रेस परिधान केला होता, तो चर्चेचा विषय ठरला, दुसरीकडे अजितदादांचा ग्रे ब्लेझर तर कमालच होता..
Devendra Fadnavis Fashion: महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागल्याची चिन्हे दिसत आहेत, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आल्याचं बोललं जातंय. गुरुवारी रात्री महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. त्यावेळी फडणवीसांनी जो ड्रेस परिधान केला होता, तो देखील चर्चेचा विषय ठरला होता. एरव्ही ते पांढरा कुर्ता आणि त्यावर काळ्या किंवा निळ्या रंगाचा जॅकेट परिधान करतात. मात्र यंदा त्यांचा पेहराव त्यांच्या व्यक्तिमत्वाला अगदी खुलून दिसणारा होता. जाणून घ्या..
देवेंद्र फडणवीसांची फॅशनही पत्नीच्या तोडीस तोड!
तसं पाहायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्या त्यांच्या ड्रेसिंग स्टाईचे अनेक फोटो शेअर करत असतात, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात. अमृता फडणवीस फॅशन दुनियेत जास्त चर्चेत असतात. अमृता फडणवीस गाण्यासोबतच मॉडेलिंग आणि बँकिंग व्यवस्थापनेत असून त्यांचे लाखो चाहतेही आहेत, मात्र आता पत्नीच्याच तोडीस तोड देवेद्र फडणवीसही फॅशनच्या बाबतीत कमी नाही, गुरूवारी अमित शाह सोबतच्या भेटीदरम्यान जो ड्रेस घातला होता. त्याची सध्या चर्चा सुरू आहे.
Maharashtra caretaker CM Eknath Shinde, BJP leader Devendra Fadnavis, NCP chief Ajit Pawar and other Mahayuti leaders meet Union HM Amit Shah and BJP national president JP Nadda, in Delhi
— ANI (@ANI) November 28, 2024
(Source - Maharashtra CMO) pic.twitter.com/8BZPGSKhbt
चेक्सची फॅशन ट्रेंडिंगमध्ये!
जिथे एकनाथ शिंदे हे नेहमीप्रमाणे पांढऱ्या शर्ट-पॅंटमध्ये दिसले, तिथे देवेंद्र फडणवीस हे नेहमीपेक्षा वेगळ्या ड्रेसमध्ये म्हणजेच काळ्या रंगाच्या कोट-पॅंटमध्ये दिसले, चौकटी म्हणजेच चेक्सची फॅशन सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये असल्याने त्यांच्या या ड्रेसिंग स्टाईलने सर्वांची मने जिंकून घेतली. यावेळी मुख्यमंत्रिपदाची चाहुल लागताच 'देवाभाऊंचा' वेषच पालटला अशा प्रकारच्या चर्चेला उधाणं आलं होतं. दिल्लीतील खास बैठकीला देवेंद्र फडणवीसांच्या चेक्सवाल्या जॅकेटची चर्चा चांगलीच रंगली...
आज दुपारी स्नेहभोजन कार्यक्रमानिम्मित दिल्लीतील पत्रकार बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील विविध सामाजिक व राजकिय विषयांवर चर्चा झाली.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 28, 2024
दिल्ली pic.twitter.com/DOsyLuQYON
अजितदादाही फॅशनच्या बाबतीत कमी नाही..
एकीकडे देवेंद्र फडणवीसांच्या काळ्या चेक्सच्या कोटची चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे अजित पवारही फॅशनच्या बाबतीच कमी नसल्याचे दिसले. दरवेळेस पांढरा कुर्ता आणि पायजम्यात दिसणारे अजितदादा एका कार्यक्रमादरम्यान चक्क ग्रे ब्लेझर-पॅंटमध्ये दिसले. त्यांची ही फॅशन खरोखरच वाखाणण्याजोगी होती. नेहमीपेक्षा वेगळ्या पेहरावातील अजितदादांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. एका स्नेहभोजन कार्यक्रमानिम्मित अजित पवारांनी दिल्लीतील पत्रकार बांधवांशी मनमोकळा संवाद साधला. महाराष्ट्रातील तसेच देशभरातील विविध सामाजिक तसेच राजकिय विषयांवर चर्चा झाली. तेव्हा अजितदादा एखाद्या अभिनेत्यापेक्षा कमी दिसत नव्हते...
मुख्यमंत्रीपदी फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याचे समजते. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केले जाऊ शकते. गुरुवारी रात्री महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. या बैठकीतच या समीकरणावर शिक्कामोर्तब झाले आहे. या बैठकीत दोन्ही मित्रपक्षांनी भाजपचा मुख्यमंत्री झाल्यास त्यावर दोन्ही पक्षांचा आक्षेप नसल्याचे मान्य केले. मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी 2 तास चाललेली बैठक मध्यरात्री संपली.
हेही वाचा>>>
Fashion: बाबोव..! नीता अंबानींची 'पॉपकॉर्न बॅग' पाहिलीत? किंमत जाणून बसेल धक्का! लेक ईशाही फॅशनमध्ये काही कमी नाही..
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )