गर्लफ्रेंड सोडून जाण्याची भीती, रडून रडून लग्नासाठी केलं राजी, 19 व्या वर्षी लग्न करणाऱ्या बड्या हिरोची भन्नाट लव्हस्टोरी माहिती आहे का?
बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्यांच्या भन्नाट लव्हस्टोरीज आहेत. सध्या अशाच एका अभिनेत्याने त्याच्या प्रेमाची आगळीवेगळी गोष्ट सर्वांना सांगितली आहे.
मुंबई : बॉलिवूड जगतात रोजच अनेक घडामोडी घडत असतात. या इंडस्ट्रीत असे अनेक दिग्गज कलाकार आहेत, ज्यांच्या प्रेमाची गोष्ट अगदीच भन्नाट आहे. काही स्टार्सची लव्हस्टोरी लग्नापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. तर काही स्टार्सना दुर्दैनावे त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळू शकलेला नाही. आवडणाऱ्या मुलीसोबत किंवा आवडणाऱ्या मुलासोबत लग्न व्हावे यासाठी काही स्टार्सने तर भन्नाट कारनामे केलेले आहेत. दरम्यान, छोड्या पडद्यावर अभिनयाची चुणूक दाखवणारा गुरमीच चौधरीची लव्हस्टोरीही अशीच काहीशी आगळीवेगळी आहे. पुढचं आयुष्य आवडत्या मुलीसोबतच घालवण्यासाठी त्याने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी लग्न केलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी तो रडलादेखील होता.
मला वाटायचं देबीना कोणाच्यातरी प्रेमात पडेल
गुरमीत चौधरीने इन्स्टन्ट बॉलिवूडवर बोलताना आपल्या लग्नाचा भन्नाट किस्सा सांगितला आहे. "मी वयाच्या 19 व्या वर्षी लग्न केलं होतं. त्या काळात देबीना बॅनर्जी दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीत मोठं नाव कमवत होती. तिला बड्या अभिनेत्यांसोबत चित्रपट मिळत होते. त्या काळात माझ्याकडे एक स्प्लेंडर बाईक होती. त्याच बाईखवर मी फिरायचो. तेव्हा माझ्याकडे पेट्रोलचेही पैसे नसायचे. दुसरीकडे देबीना मात्र यश पदाक्रांत करत होती. त्यावेळी माझ्या मनात यायचं की देबीना आता मोठ्या-मोठ्या स्टार्सोबत शूटिंग करते. तिला तिकडेच कुणीतरी प्रेमात पाडेल. देबीनाचं तिकडंच लग्न होईल. मी इकडे स्प्लेंडर गाडीवर फिरत राहील, असे विचार माझ्या मनात यायला लागले" असं गुरमीतने सांगितले.
तिचे शब्द ऐकताच मी म्हणालो लग्न करूया..
त्यानंतर मी एक दिवस तिला कॉल केला. मला तुझी खूप आठवण येत आहे, असं तिला सांगितलं. त्यानंतर तिच्यापुढे थोडंफार रडलो. बोलत असताना देबीना चुकून म्हणाली की मला वाटतंय की तिकडे येऊन तुझ्याशी लग्न करून टाकावं. तिचे हे शब्द ऐकताच हो चालेल, लगेच लग्न करूया, असं तिला बोललो. आपण एक काम करू लग्न करून टाकू. आपले लग्न झाले आहे, हे कोणालाही सांगायचे नाही, असं देबीनाला म्हणाल्याचं गुरुमीतने सांगितलं.
View this post on Instagram
लग्न करून कोणालाही सांगितलं नाही
तसेच, त्यानंतर 19 व्या वर्षी मी लग्न करून टाकलं. आम्ही लग्न केलं होतं, हे कोणालाच माहिती नव्हतं. नंतरच्या काळात माझ्याकडे स्प्लेंडर गाडीच्या ऐवजी मर्सिडीज गाडी आली. माझी प्रगती झाली. त्यानंतर काही वर्षांनी आम्ही लग्न केल्याचं घरी सांगितलं, असं गुरमीत चौधरी याने सांगितले.
हेही वाचा :
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
3 सेकंदांची क्लीप अन् तब्बल 10 कोटींचा दावा, नयनतारा-धनुष यांच्यात टोकाचा वाद, नेमकं प्रकरण काय आहे?