एक्स्प्लोर

निवडणूक संपताच नाशिकमधील बंडखोरांची भाजपमध्ये घरवापसीसाठी लॉबिंग; निष्ठावंत विरुद्ध बंडखोरांच्या संघर्षाची जोरदार चर्चा

Nashik BJP : विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर नाशिकमध्ये आता भाजपच्या घवघवीत यशामुळे निष्ठावान आणि बंडखोर हा वाद तीनही मतदार संघात पाहायला मिळत आहे.

नाशिक : विधानसभा निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) पार पडल्यानंतर नाशिकमध्ये आता भाजपच्या (BJP) घवघवीत यशामुळे निष्ठावान आणि बंडखोर हा वाद तीनही मतदार संघात पाहायला मिळत आहे. नाशिक शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना मोठा विजय प्राप्त झाला असून दोन मतदारसंघात भाजपमधून इतर पक्षात जात भाजपच्या नेत्यांनी मोठे आव्हान उभे केले होते. मात्र, निवडणुका झाल्या आणि आता पुन्हा घरवापसी करण्यासाठी बंडखोर लॉबिंग करत आहे. बंडखोरांना आता पुन्हा संधी देऊ नये, असा सूर भाजपमधून उमटत आहे.

नाशिक भाजपच्या नवनिर्वाचित तीनही आमदारांच्या समवेत संघटनात्मक बैठक भाजप कार्यालयात पार पडली. यावेळी नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. मात्र नाशिक पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांनी इतर पक्षात जाऊन भाजप उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यामुळे आता पुन्हा बंडखोरांना पक्षात घेऊ नये अन्यथा निष्ठावान पदाधिकाऱ्यांवर अन्याय होईल अशी थेट खंत नवनिर्वाचित आमदार सीमा हिरे आणि राहुल ढिकले यांनी व्यक्त केली.

काही तक्रारी असतील तर थेट माझ्याशी बोला : देवयानी फरांदे

नाशिक शहरातील मध्य विधानसभा निवडणुकीची लढत मात्र काहीशी वेगळी झाली. या मतदारसंघात मुस्लिम बहुल भागात थेट महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठा फायदा झाला. मात्र, ही निवडणूक भाजपच्या देवयानी फरांदे यांनी जिंकली. देवयानी फरांदे यांच्या विरोधात एकेकाळी मनसेतून भाजपमध्ये आलेले आणि सध्या ठाकरेंच्या शिवसेनेत असलेले माजी आमदार वसंत गीते यांनी लढवली. वसंत गीते यांना भाजपने प्रवेश दिला त्यासोबत त्यांचा मुलगा प्रथमेश गीते यांना नाशिक महानगरपालिकेत उपमहापौरपदही दिले होते. मात्र भाजपकडून विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही असा अंदाज आल्याने दोन वर्ष आधीच वसंत गीते यांनी भाजपमधून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवत निवडणूक लढवली. भाजपने बळ दिलेले नेतेच पक्षासाठी अडचण ठरत असतील तर अशांना पुन्हा संधी देऊ नये, असे म्हणत शहराध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना काही तक्रारी असतील तर थेट माझ्याशी बोला, परस्पर निर्णय घेऊ नका, असे देवयानी फरांदे यांनी म्हटले.

भाजपमध्ये गद्दारांना परत स्थान नाही : प्रशांत जाधव 

नाशिक भाजपच्या संघटनात्मक बैठकीदरम्यान तीनही नवनिर्वाचित आमदारांनी शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांचेही कान टोचले. प्रशांत जाधव यांनी विधानसभा निवडणूक अवघ्या आठवड्यापूर्वी संपली असली तरी सोडून गेलेले संपर्कात असल्याची कबुली दिली. मात्र आता भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सोडून गेलेल्या गद्दारांना पुन्हा संधी देऊ नये असा एक सूर दिसून येत असल्यामुळे आम्ही आहोत ते सर्व सक्षम आहोत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊ. पण, आता विरोधात काम करणाऱ्यांना पुन्हा संधी नाही, असा अहवाल प्रदेश स्तरावर दिला जाईल. भाजपमध्ये गद्दारांना परत स्थान नाही, हाच आमचा निर्णय असेल, असे मत भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी व्यक्त केले. 

बंडखोरांना भाजप पुन्हा संधी देणार? 

दरम्यान, आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी मोठी इच्छुकांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी भाजप अनेकदा आयारामांना संधी देताना देखील पाहायला मिळते. मात्र, यंदाची विधानसभा निवडणूक ही भाजपसाठी स्वपक्षातील बंडखोरांच्या विरोधातच असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता सोडून गेलेल्यांना भाजप पुन्हा संधी देणार की पक्षाच्या प्रदेश स्तरावर बंडखोरांना रोखण्यासाठी भाजप यशस्वी होणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. 

आणखी वाचा 

Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस, अजित पवारांसमोर एकनाथ शिंदेंनी गुगली टाकली; अमित शाहांसमोर मोठी मागणी केली!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणाWalmik Karad Case Beed Court : वाल्मिक कराडच्या रिमांडची सुनावणी आता बीड जिल्हा न्यायालयातWalmik karad beed court : वाल्मीक कराडला बीड न्यायालयात आणण्यापूर्वी पोलीस बंदोबस्त वाढवलाWalmik Karad Pimpari Chinchwad Flat : वाल्मिक कराडचा पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट सील करुन लिलाव करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ तारीख सादर केली
संतोष देशमुखांच्या अपहरणाची वेळ आणि तीन मारेकऱ्यांची फोनाफोनीची वेळ मिळतीजुळती; एसआयटीने वेळ, तारीख सादर केली
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
Mark Zuckerberg : झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!
Indian Navy : भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
भारतीय नौदलाला ट्रिपल बूस्टर, INS निलगिरी, INS सूरत आणि INS वाघशीर दाखल, धडकी भरवणाऱ्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये काय?
Team India : ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
ते 14 दिवस ते सेपरेट गाडीचा करेक्ट कार्यक्रम! नाक दाबताच तोंड उघडले; गिल, पंत, जैस्वाल अन् कॅप्टन रोहितचा मोठा निर्णय, 'लंडनप्रेमी' कोहलीचा सस्पेन्स संपेना
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का; पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचं ना हरकत प्रमाणपत्र रद्द
NCP Beed karyakarini: राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडमधील 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात; अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली
अजित पवारांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त करुन नेमकं काय साधलं? समोर आलं महत्त्वाचं कारण
Smriti Mandhana Video : 7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास, केली 'ही' मोठी कामगिरी
Embed widget