एक्स्प्लोर

Shraddha Kapoor : स्त्री 2 चित्रपटानंतर जगभरात श्रद्धा कपूरचीच जादू, प्रियंका चोप्राला टाकलं मागे; फॉलोअर्सच्या बाबतीत रचला नवा विक्रम

Shraddha Kapoor Instagram Followers : श्रद्धा कपूरने आधी नरेंद्र मोदी आणि आता प्रियंका चोप्रा यांना मागे टाकलं आहे. श्रद्धा सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असलेली भारतीय अभिनेत्री बनली आहे.

Shraddha Kapoor Social Media Followers : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनय कौशल्य दाखवत तिने चाहत्यांच्या मनावर आपली वेगळी छाप पाडली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरचा तिचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' सध्या बॉक्स ऑफिसवर धमाका करताना दिसत आहे. स्त्री 2 चित्रपटामुळे श्रद्धा कपूरच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. श्रद्धा कपूरने अभिनेत्री प्रियांका चोप्राला मागे टाकत सोशल मीडियावर नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. श्रद्धा कपूर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली भारतीय अभिनेत्री बनली आहे.

स्त्री 2 चित्रपटानंतर जगभरात श्रद्धा कपूरचीच जादू 

अभिनेत्री श्रद्धा कपूरची (Shraddha Kapoor) सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग (Instagram Followers) आहे. स्त्री 2 चित्रपटाच्या (Stree 2) यशानंतर या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्या बाबतीत श्रद्धा कपूरने प्रियंका चोप्राला मागे टाकले आहे. याआधी प्रियांका चोप्रा ही इन्स्टावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली भारतीय अभिनेत्री होती, मात्र आता श्रद्धा कपूरने तिला मागे टाकत सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री बनली आहे. श्रद्धा कपूरने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागे टाकलं आणि आता प्रियंका चोप्रालाही मागे टाकलं आहे. इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत आता फक्त विराट कोहलीच श्रद्धा कपूरच्या पुढे आहे, पण त्याला मागे टाकणं सध्यातरी तिच्यासाठी अशक्य आहे.

श्रद्धा कपूरने प्रियंका चोप्राला टाकलं मागे

एकीकडे श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करत असताना दुसरीकडे ती भारतात इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली अभिनेत्री बनली आहे. अलीकडेच श्रद्धा कपूरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना इंस्टाग्रामवर फॉलोअर्सच्याबाबतीत मागे टाकत तिसरा क्रमांक पटकावला होता. आता तिने ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रालाही मागे टाकलं आहे. श्रद्धा आता इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो होणारी दुसरी भारतीय सेलिब्रिटी बनली आहे. तर 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा आता तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.

फॉलोअर्सच्या बाबतीत रचला नवा विक्रम

'स्त्री 2'च्या यशानंतर श्रद्धा कपूरच्या फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. आता त्याचे इंस्टा वर 91.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर प्रियांका चोप्राचे सध्याचे इंस्टा फॉलोअर्स 91.8 मिलियन आहेत. श्रद्धा कपूर आणि प्रियांका चोप्रानंतर आलिया भट्टचे सर्वाधिक 85.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी, दीपिका पदुकोणचे सध्या 79.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय अभिनेत्रींच्या यादीत श्रद्धा कपूर पहिल्या क्रमांकावर आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

सर्वाधिक इंस्टाग्राम फॉलोअर्स असणारी बॉलिवूड अभिनेत्री

श्रद्धा कपूर गेल्या 14 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहे. 2010 मध्ये 'तीन पत्ती' या चित्रपटातून त्याने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला, पण त्याला फारशी ओळख मिळाली नाही. यानंतर त्याला 'आशिकी 2' हा चित्रपट मिळाला, ज्याने तो रातोरात स्टार बनला. यानंतर श्रद्धा कपूरने मागे वळून पाहिले नाही. 'आशिकी 2' च्या यशानंतर श्रद्धा कपूरने 'एक व्हिलन', 'ABCD 2', 'बागी', 'स्त्री', 'हैदर' छिछोरे, साहो, 'तू झुठी में मक्कर' असे अनेक हिट चित्रपट दिले. आजकाल त्याचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bahubali : 'या' बॉलिवूड अभिनेत्रीने नाकारला होता ब्लॉकबस्टर बाहुबली चित्रपट, दुसऱ्या नायिकेनं केलं संधीचं सोनं, रातोरात बनली स्टार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Muddyache Bola : Sangli : पलूसचा बालेकिल्ला काँग्रेस राखणार ? : ABP Majha : Vidhan Sabha ElectionZero Hour : मनोज जरांगेंच्या निर्णयाचे राजकीय अर्थ, राज्यात काय परिणाम?Zero Hour : बंडखोरांमुळे टेन्शन, कोल्हापुरात 'ड्रामा' काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागेDevendra Fadnavis : कोल्हापुरातील प्रकार आश्चर्यकारक, उत्तर कोल्हापूरमधून काँग्रेस गायब झालीय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Maharashtra Politics : सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
सांगली पॅटर्न राबणार, काँग्रेसचे बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांनी शड्डू ठोकला, चिन्ह देखील मिळालं
Embed widget